वहागाव चे सरपंच प्रशांत कोल्हे हे गावामध्ये जातीय तणाव निर्माण करून आराजक्ता माजवीण्याचे काम करीत आहे ऑल इंडिया पँथर सेनेचा आरोप

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - मौजा- वहानगाव, तहसील चिमुर, जिल्हा चंद्रपूर येथे सरकारी स्वस्त धान्याच्या दुकानाचा परवाना मृतक मंगलाबाई गुलाबराव गौरकार या नावाने होता. तिने आपल्या हयातीत स्वस्त धान्य परवान्यावर सुरज प्रकाश रामटेके या नातवाच्या नावाची आपले वारस म्हणून नोंद केली आहे. व यासाठी कायदेशिर रित्या रजिस्ट्रीकृत मृत्युपत्र सुध्दा तयार केले आहे.
सदर मृत्यूपत्रानुसार वारस म्हणून कायदेशिर रीत्या संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी केल्यावर सहकारी स्वस्त धान्य दुकान, वहानगाव येथील दुकान सुरु करण्याचे आदेश काढले.संपूर्ण प्रक्रीया कायदेशिर रित्या पार पाडली, असे असतांना मौजा वहानगाव चे सरपंच प्रशांत कोल्हे यांनी सुरज प्रकाश रामटेके हे असुसूचित जातीचे असल्याच्या कारणाने गावात बेकायदेशिर रित्या स्पीकर वरुन गावात मिळालेल्या स्वस्त धान्य दुकानाबाबत बेकायदेशिर रित्या सभा घेत होता. हे बेकायदेशिर असतांना झालेल्या सभेत गावातील नागरीकही उपस्थित होते. पण स्वस्त धान्य दुकानाबाबत गावातील नागरीकांनी विरोध दर्शविला नसल्याने सरपंच प्रशांत कोल्हे यांचे मनसुबे उघडे पडले.
प्रशांत कोल्हे यांनी याच सभेत विषय पलटवत गावात स्वच्छता अभियान राबविण्याचे सांगून सदर बुकावर कोणताही ठराव न लिहीता गावातील नागरीकांच्या सह्या घेत होता. गावातील जागरुक नागरीकांनी सहया न केल्याने सरपंच प्रशांत कोल्हे हा घरोघरी जाऊन गावातील नागरीकांवर दबाव निर्माण करीत व आपल्या अधिकाराचा धाक दाखवत बेकायदेशिर रित्या रहिवाशी नागरीकांच्या सहया घेऊन सुरज प्रकाश रामटेके यांना स्वस्त धान्य दुकान मिळाल्याने गावातील नागरीक असंतोष असल्याच्या अफवा पसरवीत पत्रकार परिषद घेतली.वहानगाव येथील विद्यमान सरपंच प्रशांत कोल्हे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून यांच्यावर तडीपारीची कारवाई सुध्दा प्रशासनाने केली आहे. काही महिण्यापूर्वी सरपंच प्रशांत कोल्हे यांनी अनुसूचित जमातीच्या अंजनाबाई दागोजी सावसाकडे, वय ५५ वर्षे, या वृध्द महिलेला मारहान सुध्दा केली होती. याबाबत शेगाव पोलीस स्टेशनला अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हयाची नोंद झाली होती. सरपंच प्रशांत कोल्हे हा नेहमी अनुसूचित जाती व जमातीच्या नागरीकांबाबत गावातील नागरीकांत अराजकता व तनाव निर्माण करण्याचे नेहमी प्रयत्न करीत असतो.गावात काही जागरुक नागरीक असल्याने सरपंच प्रशांत कोल्हे याचे जातीय दंगल घडविण्याचे कट कारस्थान हानुन पाडीत असल्याने दिशाभूल केलेल्या ठरावानुसार पत्रकार बघुना सोबत घेऊन खोट्या बातम्यांव्दारे स्वतःची वाह-वाहकी करण्यासाठी वृत्तपत्रात प्रसीध्द करुन गावातील नागरीकाची तथा शासनाची व प्रशासनाची सातत्याने दिशाभूल करीत असतो.म्हणून अशा गुन्हेगार प्रवृत्तीचा सरपंच असलेल्या प्रशांत कोल्हे या इसमावर कायदेशिर कारवाई करून अंकुश लावने गरजेचे आहे. प्रशांत कोल्हे हा एका राजनीती पार्टीचा पदाधिकारी असून बेकायदेशिर रीत्या असे दंगल घडविण्याचे कृत करीत असतो.म्हणून याबाबत जिल्हाधिकारी ,पोलीस अधिक्षक ,मुख्यमंत्री ,गृहमंत्री ,पालकमंत्री यांच्याकडे सुद्धा तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]