मॅजिक बस इंडिया फाउंडेशन समुदाय समन्वयक यांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

मॅजिक बस इंडिया फाउंडेशन समुदाय समन्वयक यांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न   
         
              
मुल : मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. श्री. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका निरीक्षक कु. निकिता ठेंगणे यांच्या नेतृत्वात मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन मुल येथील शाळा मधील  मूल  तालुक्यात  "SCALE" कार्यक्रमा अंतर्गत  विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी "खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास" हा उपक्रम मागील वर्षापासून अविरतपणे राबविला जात आहे.    आज दिनांक 14/10/2022 ला नवभारत कन्या विद्यालय मुल येथे गावातील समुदाय समन्वयक यांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.त्यामधे गावातील सर्व घटकासोबत काम करण्यासाठी व गावातील सर्व समित्या,मंडळ,गट,आणि महत्वाचं शाळा आणि गाव यांना जोडणारा दुवा म्हणजे समुदाय समन्वयक नेमल्या जातात,या कार्यशाळेमध्ये समुदाय समन्वयकाना आदर्श गाव,आदर्श शाळा बनविण्यासाठी गावात कोणत्या घटकसोबत काम करावे लागेल व मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी जिवणकौशल्याचे महत्व पटवून दिले सोबतच दिवाळीच्या सुट्यांमध्ये सुध्दा मुलांना विविध उपक्रमांनी अभ्यासाशी जोडून ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले. ..या  कार्यशाळेला मुल तालुक्यातील 19 गावातील समुदाय समन्वयकानी उपस्थिती दर्शविली .. व सदर कार्यशाळेचे आयोजन शाळा सहाय्यक अधिकारी दिनेश कामतवार व शुभांगी रामगोनवार यांनी केले....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]