वाघाच्या हमल्यात चिखलगाव येथील शेतकरी जखमी

वाघाच्या हमल्यात चिखलगाव येथील शेतकरी जखमी
तळोधी (बा.) 
                 तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या तळोधी बीटातील चिखलगाव येथील शेतकरी सकाळच्या सुमारास आपल्या शेतावर काम करायला गेला असताना. शेतकरी नामे भाऊराव तुकाराम गेडाम वय ६५ वर्ष  आपल्या शेतावर वाकून काम करत असताना तिथून भटकणाऱ्या वाघाने हमला करून जखमी केले. जखमीच्या डोक्यावर आणि छातीवर  जखमा आढळून आल्या. सदर जखमीने वाघाची झुंज करून आपला प्राण वाचवले व स्वतः नदीच्या पात्रातून पोहून येऊन गावातील लोकांना सूचना दिली त्यानंतर वन विभागाला माहिती मिळताच.सदर जखमी इसमास वन विभागांनी प्रथम उपचार करण्याकरता शिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. 
      सदर व्यक्तीचे शेत हे चिखलगाव वाढोणा च्या मधेतून वाहणारे बोकडोह नदीच्या बाजूला आहे. आणि त्या परिसरामध्ये सध्या वाघाचे वावर असल्यामुळे ही घटना घडल्याचे समजते. त्या परिसरात सध्या वाघाचा वावर असल्याने व आजची ही वाघाच्या हमला ची घटना घडल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले असून सध्या धानाचे हंगाम असल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेले आहेत. 
      तरी वन विभागाने याकडे लक्ष देऊन वाघाचा बंदोबस्त करावा असा परिसरातील लोकांतून आवाज उठत आहे.
"सध्या शेतामध्ये धानाचे पीक असल्यामुळे त्याकरिता रानटी डुकरे व सांबर, चितळे, सारखे प्राणी शेताकडे वळलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या मागोमाग वाघासारखे प्राणी सुद्धा शेतांच्या दिशेने भटकू लागलेले आहेत. तरी या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी शेतावर जाताना व वावरताना स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेणे,व सावधानता बाळगणे गरजेचे आहे. जेणेकरून कुणालाही आपले प्राण गमवावे लागणार नाही."
     - यश कायरकर, अध्यक्ष, स्वाब नेचर केअर संस्था.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]