मालधक्कास समर्थन देणाऱ्यांना पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सुनावले खडे बोलमुल शहरातील मालधक्क्यातून लोहखनिज वाहतूक करावी अशी मागणी घेऊन गेलेल्या काही भाजप कार्यकर्त्यांना पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी चांगलेच फैलावर घेतल्याची विश्वसनीय माहिती आहे. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे रौद्ररूप पाहून मालधक्याचे समर्थनार्थ गेलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी तिथून काढता पाय घेतल्याची माहिती आहे.
मूल येथील मालधक्कातून लोहखनिजाची वाहतूक करण्यास कंपनीला सोयीचे व्हावे यासाठी कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी मूल येथील अलीकडे अज्ञातवासात गेलेल्या राजकीय व्यक्तींना 50 लाख रुपये ऍडव्हान्स दिल्याची खात्रीलायक माहिती आहे. या नेत्यांनी आपल्या जुन्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून शहरात मालधक्का झाल्यास हजारो बेरोजगारांना रोजगार मिळेल अशी खोटी माहिती देत सह्या घेतल्या. आज पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आज मालधक्काचे समर्थन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना सुनावीत अप्रत्यक्ष या बाबीचा ही उल्लेख केल्याची माहिती आहे.
सुरजागड येथील लोहखनिजाची वाहतूक येथील मालधक्कातून करण्याचे प्रयत्न होताच स्थानिक मूलवासीयांनी याला विरोध दर्शविला. ही वाहतूक व शहरातील मध्यवर्ती रस्त्याने होणार असल्याने रस्त्याची वाट लागणार आहे. मोठ्या प्रमाणावर अपघाताची शक्यता होती जलप्रदूषण वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर होऊन सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी विकसित केलेले मूल शहराचे रूपच पालटण्याची भीती मूल वासीयाकडून व्यक्त केली जात आहे.
मालधक्का समर्थकाची फुकटात वकिली का?
ज्या कंपनीचा मुल शहराला कोणताही फायदा नाही, ज्या मालधक्यास संपूर्ण मूल वासियांचा विरोध आहे अशा परिस्थितीत, जी कंपनी मूल येथील मालधक्क्यातून लोहखनिजाची वाहतूक करीत अब्जो रुपये कमावणार आहे, त्या कंपनीसाठी, हजारो बेरोजगारांना रोजगार मिळणार अशी आपल्याच गावबंधूला खोटी माहिती देत, या कंपनीचे फुकटात वकीली का करीत आहेत? असा प्रश्न आता यानिमित्ताने निर्माण झाला आहे? आज पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना भेटण्याकरिता जवळपास तीन ते चार गाड्यांनी मालधक्काची बाजू मांडण्याकरिता गेले असल्याची माहिती आहे, गेलेल्या कार्यकर्त्यापैकी जे नेतृत्व करीत होते त्यांची  आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. या सर्वांचा खर्च करणारी अदृश्य शक्ती कोण आहे याबद्दलही आता चांगली चर्चा रंगत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]