पंतप्रधान पीक विम्याची रक्कम दिवाळीच्या आत शेतकऱ्याच्या खात्यात जमा करा.

पंतप्रधान पीक विम्याची रक्कम दिवाळीच्या आत  शेतकऱ्याच्या खात्यात जमा करा.


उपविभागीय अधिकारी वरोरा यांना शेतकऱ्याचे निवेदन ..

शेगाव...जगदीश पेंदाम

येथील परिसरातील  राळेगाव, चारगाव , अर्जुनी , वायगाव, दादापुर, धानोली , बेंबळा, वडधा,सोनेगाव , उमरी, बोरगाव, इत्यादी अनेक गावातील शेतकरी यांनी आपल्या शेत पिकाच्या संरक्षण करिता आपल्या पिकाचा पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत एच डी एफ सी कंपनी कडून आपल्या शेत पिकाचा विमा उतरविला असून या वर्षी अतिवृष्टीमुळे अती सततधार पावसामुळे अनेक शेतकऱ्याचे पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले...
 याची माहिती संबंधित एच डी एफ सी विमा कंपनी ला दिली असता याची सखोल चौकशी कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी करून पंचनामे केले परंतु काही दींवसे लोटून देखील पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मोबदला देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला त्यामुळे पीडित शेतकरी हा अधिक अडचणीत सापडला असून त्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे .तसेच समोर रब्बी हंगाम येत असून या पिकासाठी बि बियाणे खरेदी कसे करायचे ?  असा प्रश्न शेतकऱ्या समोर पडला आहे. करिता आम्हा पीक विमा उतरविलेल्या शेतकरी बांधवांना शेत पिकाची विमा रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी करिता शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी शिंदे यांना निवेदन सादर करून आपल्या हक्काच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी  शिंदे साहेब यांनी संबंधित एच डी एफ सी पिक विमा कंपनी कडून विमा दावा मंजूर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिवाळीच्या आत शेतकऱ्याच्या खात्यात तात्काळ जमा करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी श्री जयेंद्र टेमुर्डे,अभिजीत पावडे, गुणवंत देहारकर, छगन आडकीने , शंकर खाडे, श्रावण जीवतोडे, सिद्धार्थ थुल, नरेंद्र गरमडे, व अन्य पीडित शेतकरी बांधवांनी केली आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]