सर्वाधिकारी म्हणून लक्ष्मण गमे यांची नियुक्ती पुरोगामी शिक्षक संघटनेतर्फे स्वागत व सत्कार

सर्वाधिकारी म्हणून लक्ष्मण गमे यांची नियुक्ती
पुरोगामी शिक्षक संघटनेतर्फे स्वागत व सत्कार
          आपल्या जीवनात विवेकाचा वसा घेऊन समाजोपयोगी कार्यात स्वतःला वाहून घेणाऱ्या लक्ष्मणराव गमे यांची अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम, मोझरी येथे  सर्वाधिकारी म्हणून नियुक्ती झाली . 
          नवनियुक्त सर्वांधिकारी लक्ष्मण गमे हे अखिल भारतीय  श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी ता. तिवसा जि. अमरावतीचे माजी उपसर्वांधिकारी होते  . अ.  भा. श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमचे  सदस्य,  जि प चंद्रपूरचे माजी सदस्य तसेच  माजी  सभापती ,  श्री गुरुदेव सेवा मंडळ  वरोराचे आजीवन प्रचारक असे विविध पदे भूषवलेल्या लक्ष्मण गमे यांची अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम  मोझरी येथे  सर्वाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती च्या वतीने स्वागत करून  शुभेच्छा देण्यात आल्या.
         याप्रसंगी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष  पंडित लोंढे , तालुका अध्यक्ष  रामचंद्र नागपुरे , वरिष्ठ तालुका नेते  गणपत विधाते ,सरचिटणीस संदिप चौधरी , कार्याध्यक्ष  उमेश आखाडे , कोषाध्यक्ष  गजानन पाचभाई , उपाध्यक्ष  केशव मिलमीले व भास्कर गाडगे , प्रमुख संघटक रवींद्र गावंडे , कानकाटे  व कार्यालयीन सचिव  प्रदिप ढोके  व  नंदकिशोर खिरटकर उपस्थित होते. लक्ष्मण गमे यांच्या कार्याची दखल घेऊन सर्वाधिकारी म्हणून झालेल्या नियुक्तीने सर्वत्र आनंद व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]