भिवराबाईच्या कविता ईश्वरीय श्रद्धा भावाने ओथंबलेल्या - बंडोपंत बोढेकर

भिवराबाईच्या कविता ईश्वरीय श्रद्धा भावाने ओथंबलेल्या - बंडोपंत बोढेकर

गडचिरोली ( प्रतिनिधी)
    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताहाच्या निमित्ताने श्री गुरुदेव सेवा मंडळात चंद्रपूर जिल्ह्यातील कवयित्री सौ. भिवराबाई  बाबुराव आत्राम  आलेल्या होत्या. त्या  सेवा मंडळाच्या भजन मंडळात सहभागी होऊन आपल्या सेवा देऊन गेल्यात. गुरूमहिमा नावाचा गीत संग्रह त्यांचा प्रकाशित झालेला आहे.
पुण्यतिथी महोत्सवात त्याची मुलाखत ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी घेतली असता त्यांच्या स्वरचित कवितांचे गायन ऐकुन  गुरुदेव सेवक मंत्रमुग्ध झाले. भिवराबाई आत्राम या अशिक्षित असून त्यांनी म्हटलेला प्रत्येक शब्द त्यांच्या मुलांनी टिपून घेत काव्यसंग्रह काढला. वयाच्या १५ व्या  वर्षापासून त्या कविता उत्स्फूर्तपणे  सादर करीत आहेत.  गुरु महिमा या  काव्यसंग्रहात ईश्वरांप्रती श्रध्दाभाव आणि  गुरूवचनांप्रती त्यांचे असलेले समर्पण दिसून येते, असे प्रतिपादन बंडोपंत बोढेकर यांनी यावेळी केले.  अशा या प्रतिभावान ग्रामीण कवयित्रीचे अ. भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळ गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीने ग्रामगीता देऊन सन्मानित केले.  भिवराबाईच्या कविता आत्मिक चिंतनातून आलेल्या असून ज्या पद्धतीने त्या  आपलं जीवन जगल्या , हालअपेष्टा सहन केल्या,त्याच वास्तव चित्रण त्यात दिसून येते असे ते म्हणाले. यावेळी भिवराबाई च्या सोबतीन  करंजी येथील  सुमनबाई जेंगठे उपस्थित होत्या.  श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हाप्रमुख डॉ. शिवनाथ कुंभारे, पंडित पुडके , अरविंद पाटील वासेकर, संदीप कटकुरवार, केशवराव देशमुख, पंकज भोगेवार आदींनी  भिवरा बाईंच्या कलागुणांचे कौतुक केले. झाडीबोली साहित्य मंडळाच्या अनेक कार्यक्रमात भिवराबांईनी यापुर्वी उपस्थित दर्शविली असून आपल्या कवितेचे गायनासह सादरीकरण केले आहे,हे विशेष.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]