गुरुदास गुरुनुले मूल तालुका काँग्रेसचे नवे अध्यक्षगुरु गुरुनुले मूल तालुका काँग्रेसचे नवे अध्यक्ष
मूल तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी पत्रकार गुरु गुरनुले यांची निवड करण्यात आली आहे.
प्रदेश निवडणूक अधिकारी पालम राजू यांनी या नियुक्तीस मान्यता दिली असून, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस (प्रशासन व संघटन)  प्रमोद मोरे यांनी नियुक्ती जाहीर केली आहे.
आज चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच तालुका अध्यक्ष ची निवड करण्यात आली. यात अनेकांची फेर निवड करण्यात आली मात्र मूल तालुका काँग्रेस अध्यक्षपदावरून घनश्याम येनूरकर यांचे जागेवर पत्रकार गुरु गुरुनुले यांची निवड करण्यात आली आहे.
गुरुदास गुरनुले हे मूल येथील ज्येष्ठ पत्रकार असून ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते आहे. क्रांतीज्योती पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत तसेच सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यात काँग्रेसला बळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]