उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदोन्नतीचा मार्ग मोकळा मुख्य कार्यकारी अधिकारी यांची हिरवी झेंडी

उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदोन्नतीचा मार्ग मोकळा
 मुख्य कार्यकारी अधिकारी यांची हिरवी झेंडी
   चंद्रपूर (चंद्रपूर)   
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती चे वतीने प्रथम 6 डिसेंबर 2021 ला तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन उच्चश्रेणी मुख्याध्यापक  तात्काळ करावी असा विषय अल्का ठाकरे मॅडम महिला राज्याध्यक्ष,दीपक वऱ्हेकर जिल्हा संघटक  ,यांच्या उपस्थितीत राज्यनेते विजय भोगेकर यांनी मांडला. मागील तीन वर्षापासून उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदोन्नती रोस्टर चा नावाखाली करण्यात आली नव्हती , ती तात्काळ करण्यात यावी असे महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने आग्रह धरण्यात आला   त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली  सेठी यांनी तात्काळ दखल घेऊन सदर पदोन्नतीची फाईल तयार करण्यात यावी अशी सूचना दीपेंद्र लोखंडे , शिक्षणाधिकारी चंद्रपूर यांना दिली .त्यानुसार शिक्षण विभागाने या फाईलची कार्यवाही करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत तब्बल नऊ महिन्याचा कालावधी उच्च श्रेणी पदोन्नतीसाठी लागला . यादरम्यान महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदोन्नती बाबत जिल्हा परिषद च्या वरिष्ठ अधिकारी यांच्या भेटी घेतल्या , निवेदने दिली .  शिक्षकदिनी 5 सप्टेंबरला मोठे आंदोलनही केले त्यावेळी प्रशासनाच्या वतीने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार यांनी एक महिन्याचा कालावधी मागून घेतला . एक महिन्यानंतरही समस्या निकाली निघाली नाही , म्हणून महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने ११ ऑक्टोबरपासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला . त्याची दखल घेत चंद्रपूर जिल्हा परिषदला नव्याने रुजू झालेले  मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी समस्येची तीव्रता लक्षात घेत  आठवड्याची मुदत मागून ही फाईल ओके केली   असून समुपदेशन घेऊन उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या जागा भरण्याचे निश्चित झाले आहे   
                      मिळालेल्या माहितीनुसार 28 ऑक्टोबर ही तारीख किंवा त्यापूर्वी पदोन्नती प्रक्रिया केली जाईल अशी माहिती मिळाली. या पदोन्नती मुळे अनेक सेवाज्येष्ठ शिक्षकांना याचा लाभ मिळणार आहे .  अनेक सेवा जेष्ठ शिक्षकांची पदोन्नती  झाल्यामुळे विषय  शिक्षकांकरीता पद रिक्त होणार आहे.ही पदोन्नती प्रक्रिया सुलभ होण्यास ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांच्या लढ्याला यश आले असून पुरोगामी संघटना प्रशासनाच्या सकारात्मक निर्णयाचे स्वागत करीत आहे  .
       यासंदर्भात झालेल्या भेटीमध्ये राज्यनेते विजय भोगेकर ,माजी जिल्हा अध्यक्ष श्री दीपक वऱ्हेकर,सचिव सुरेश गीलोरकर उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]