चिमूर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी बेपत्ता आणि रेती माफिया झाले सक्रिय

दिवस रात्र उमा नदी गोरवट येथील मोठ्या प्रमाणावर रेती उपसा सुरु

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चिमूर तालुक्यामध्ये मागील दहा दिवसांपासून तालुक्याचे उपविभागीय अधिकारी बेपत्ता झालेले दिसून येत आहे. याचाच फायदा घेत रेती माफिया सक्रिय झालेले दिसायला सुरुवात झाली आहे.अवैध रेती माफीयांनी कसलीही भीती न बाळगता खुलेआम सर्रास अवैध रित्या रेतीचा उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू केला आहे.असे असून तहसीलदार , नायब तहसीलदार, आर.आय , पटवारी यांची टोळी या रेती माफियांवर मेहेरबान झाल्यागत दिसून येत आहे.दैनंदिन कुठल्याही माफियांवर कारवाई करण्यात येत नाही. महसूल अधिकारी यांना कुणीही माहिती दिली कि ते आमच्याकडे पथक नसल्याने आम्ही कारवाई करु शकत नाही. अशी उत्तरे जनतेला दिली जाते. या रेती माफियांवर अधिकारी यांचे वचक नसल्याने यांची मुजोरी वाढली असून जनतेची रात्रोची झोप उडाली आहे. तर काही माफिया पत्रकारांना धमकी देण्यात मस्त आहे. असे असतांना शांतता दैनंदिन भंग होतांना दिसत आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]