एफ.ई.एस.गल्स॔ काॅलेज, चंद्रपुर येथे वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम संपन्न

एफ.ई.एस.गल्स॔ काॅलेज, चंद्रपुर येथे वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम संपन्नप्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल

फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपुर द्वार संचालित एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपुर येथिल रासेयो व ग्रंथालय विभाग द्वारा डॉ. ए .पी .जे .अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ मिनाक्षी ठोंबरे, प्रमुख अतिथी प्रा.डॉ शिला नरवाडे, इग्रंजी विभाग प्रमुख चिंतामणी महाविद्यालय पोभुणा॔ व सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली,प्रा अशोक बनसोड,रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र बारसागडे यांची प्रामुख्याने विचारमंचावर उपस्थिती होती.
कार्यक्रमा प्रसंगी डाॅ मिनाक्षी ठोंबरे यानी वाचन प्रेरणा दिनाचे महत्व सागुंण डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या कार्यवर प्रकाश टाकला, प्रा डॉ शिला नरवाडे यानी डॉ ए पी जे अब्दुल कलाम यानी भारताला वैज्ञानिक दृष्टिकोणात पुढे नेण्यास महत्वाची भुमिका होती तसेच विद्यार्थिनीनी  मोबाइल वेढे न होता कमीत कमी रोज एकतास पुस्तकाचे वाचन करावे  असा महत्वाचा सल्ला दिला तर रासेयो स्वयंसेवीका कुमारी सूफिया शेख, तन्वी भगत,शृती गवारे यानी सुध्दा कार्यक्रम प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाचे औचित्य साधुन ग्रंथलयात डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पुस्तकाचे वाचन करण्या करीता ग्रंथ प्रदर्शन ठेवण्यात आले होते.
कार्यक्रमाचे आयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र बारसागडे,प्रा डॉ कल्पना कावळे मॅडम यानी केले 
वाचन प्रेरणा दिन या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रा अशोक बनसोड तर
सुत्र संचालन प्रा डॉ राजेंद्र बारसागडे यानी केले
वाचन प्रेरणा दिन या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्या करीता वामण तपासे,सुशिल पुप्पलवार, रमेश गुरुनूले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


कार्यक्रमाला प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनीनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]