पांढरवानी येथील कोतवालास मजरा येथील इसकमाडून चिमूर तहसील कार्यालयात बेदम मारहाण

चिमूर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चिमूर येथील तहसील कार्यालयात पी.एम.किसान टेबलवर नियुक्ती करण्यात आलेल्या आकाश चौधरी  या कोतवाल कर्मचारी यास मजरा येथील इसमाकडून मारहाण झाली हा प्रकार चिमूर तहसील कार्यालयात  पी.एम.किसान टेबलावर नियमित कार्यरत असलेला कर्मचारी हा नेहमी प्रमाणे कामावर हजर असतांना मजरा येथील इसमाने माझा किसान चा फॉर्म डिलीट करायचे आहे.असे कर्मचारी यांना विचारले व साईड बंद असल्याने ते काम सध्या होऊ शकत नाही असे समजविले व माझ्याकडून माहिती योग्य न वाटल्यास वरिष्ठांना विचारणा करू शकता असे सांगितले असता काहिही न बघता कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली.यामुळे कोतवाल हा गंभीर जखमी झाला असून उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचार सुरु आहे.याबाबत चिमूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]