सावरी बिड बोथली रस्त्याचे खडीकरण करण्यात यावे अशी मागणी मिलिंद खोब्रागडे,चेतन खोब्रागडे

शेतकऱ्यांना शेतात जाण्या करिता मोठे संकट

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - चिमूर तालुक्यातील पावसामुळे सावरी (बिड) ते बोथली परिसरातील अनेक गावातील शेतशिवारात जाणाऱ्या पांदण रस्त्याची दैनावस्ता झाली आहे. शेतात जायचे कसे असा मोठा संकट प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सावरी ते बोथली गावातील शेत पांदण रस्ते पावसामुळे चिकलमय झाले आहेत. एन हंगामाच्या सुरुवातीला शेतकरी बियाणे खते शेतातील झोपडीत नेऊन ठेवतात मात्र शेतीच्या हंगामापासून शेतकऱ्याचा माल घरात येईपर्यंत याच चिखलमय पांदण वाहून गेलेले रस्ते त्यास शेतकऱ्यांना रस्त्यावरून कसरत करावी लागत आहे. शेतकऱ्यासाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबविते मात्र ग्रामीण भागात योजनाची पायमल्ली होत आहे. अनेक वर्षापासून पांदण रस्त्याची स्थिती जैसे थे आहे. यात प्रशासनाचा लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करित असल्याचा आरोप चेतन खोब्रागडे, मिलिंद खोब्रागडे,यांनी केले आहे .या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. पावसाने पांदण रस्ता खराब झाला आहे. मोठ्या प्रमाणात चिकन झाल्याने व बांधन रस्ता पाण्याच्या अभावाने फुटल्याने शेतीला कामासाठी मजूर व खत बैलबंडी नेताना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्रास करावा लागत आहे. त्यामुळे पांदण रस्त्याचे खडीकरण करण्यात यावे अशी मागणी प्रहार सेवक चेतन खोब्रागडे,मिलिंद खोब्रागडे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]