लोकविद्यालयाच्या 5 विद्यार्थ्यांचा पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती(इ.५वी) परीक्षेत उत्कृष्ठ यश

लोकविद्यालयाच्या 5 विद्यार्थ्यांचा पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती(इ.५वी) परीक्षेत उत्कृष्ठ यश

उज्वल यशाची परंपरा कायम

तळोधी(बा):
    दी रूरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरी सन १९६० द्वारा संचालित लोकविद्यालय तळोधी (बा) येथील ५ विद्यार्थ्यांनी पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती (इ.५वी) परीक्षेत उत्कृष्ठ यश संपादन केले आहे.
               ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करून पात्र ठरणे हे अभिमानास्पद आहे अशी प्रतिक्रिया शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पालकांनी दिली आहे.यामध्ये कु.अनुराधा बाबुराव गावतुरे(168) ,आयुष सतीश कामडी(156), कु.मैथिली गजानन ताटकर(152),कु.लक्षिता बाबा नागोसे(130) ,कुणाल नामदेव गायधने(126) अशी गुणवंत विद्यार्थ्यांची नावे आहेत.
   त्याच्या उत्कृष्ठ यशाबद्दल दी रूरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरी(सन1960) द्वारा संचालित लोक विद्यालय तळोधी(बा)चे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.व्ही.एस. तोंडरे साहेब ,संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सचिव श्री.आर.एस.राऊत साहेब ,व्ही.एस. बगमारे साहेब, ए.आर.नागमोती साहेब, ए.एम.राऊत साहेब, डी.पी.समर्थ साहेब सदस्य दि रूरल एज्युकेशन सोसायटी यांनी कौतुक केले.
     विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.वाय.बांगरे ,सहा. शिक्षक पि.यु. गिरडकर,आर.एम. निनावे, मार्गदर्शक शिक्षक संतोष नन्नावार, अजय सगळाम ,ज्योती निकोडे ,स्नेहा भरडकर इतर शिक्षक, शिक्षिका, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले.
      विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षक व आपल्या आई-वडील  यांना दिले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]