वाढोणा येथे नेत्र शस्त्रक्रिया तपासणी शिबिराचे आयोजन.

वाढोणा येथे नेत्र शस्त्रक्रिया तपासणी शिबिराचे आयोजन.


तळोधी बा.
  ग्राम पंचायत वाढोणा , समता फाउंडेशन मुंबई व विनोद भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे, यांच्या संयुक्त विद्यमानाने आज वाढोणा या गावात भव्य नेत्र शस्त्रक्रिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.     
            यावेळेस गावातील व परिसरातील एकूण 189 लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर यापैकी 91 लोकांची नेत्र शस्त्रक्रिये करता निवड करण्यात आली . ही शस्त्रक्रिया मेघे सावंगी येथील विनोबा भावे रुग्णालयामध्ये केली जाणार आहे. 
  लोकांना दवाखान्यापर्यंत जाऊन तपासणी न करता गावामध्येच अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन केल्यामुळे गावकऱ्यांना तपासणी करण्यास सोपे जाते व जास्तीत जास्त लोकांना या संधीचा लाभ घेऊन नेत्र तपासणी करता येते.
    नेत्रदान तपासणी शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच देवेंद्र गड गेडाम हे ,  चिकित्सक डॉ. सुभाषचंद्र दुधे नेत्र चिकित्सक अधिकारी ग्रामीण रुग्णालय शिंदेवाही, डॉ. शितल गायकवाड वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्र वाढोणा, व भगवान बनसोड उपसरपंच वाढोणा, अनिल डोर्लीकर, वासुदेव मस्के, प्रदीप येसनसुरे, मीनाक्षी कोमावार , शशिकला ठाकरे हे संपूर्ण  ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]