भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी नागभीड तालुक्यातील हजारो कार्यकर्ते सोमवारी रवाना होणार

भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी नागभीड तालुक्यातील हजारो कार्यकर्ते सोमवारी रवाना होणार
तळोधी बा: 
      कन्याकुमारी येथुन निघालेली भारत जोडो यात्रा ६० दिवसाचा प्रवास करून ७ नोव्हेंबर ला नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातून महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या अखंड भारताची संकल्पना घेऊन भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करणारे काग़्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे जागोजागी समविचारी राजकीय पक्षासहित सामाजिक संघटनेच्या वतीने मोठ्या उत्साहाने स्वागत केले जात आहे. या देशातील हुकुमशाही चा नायनाट करण्यासाठी मी चालणार या देशव्यापी भावनेतून लाखो नागरिक या भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहे. ही यात्रा विदर्भातील वासिम, बुलडाणा आणि अकोला या जिल्हयातुन जात असल्याने नागभीड तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिक यात्रेत सहभागी होण्यासाठी सोमवार १४ नोव्हेंबर ला वासिम ला रवाना होणार आहेत. अशा प्रकारचे भारत जोडो यात्रा एतिहासिक स्वरूपाचे असल्यामुळे नागरिक यात्रेत सहभागी होण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]