वाढोणा येथे गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते एकत्र येऊन केली सामुदायिक प्रार्थना

वाढोणा येथे गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते एकत्र येऊन केली सामुदायिक प्रार्थना
तळोधी (बा.)         
      वाढोना येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या तिनही मंडळांनी भु- वैकुंठ आत्मानुसंधान अड्याळ टेकडी यांच्या दि.19-11-2022 ला सहयोग व प्रचार दौंर्या निमीत्ताने सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने एकत्रीत येऊन सामुदायिक प्रार्थना केली,या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले उपस्थित डॉ.नवलाजी मुळे गुरुजी भु वैकुंठ आत्मानुसंधान अड्याळ टेकडी श्री.पुडलीकजी रोडे चंद्रपूर मधुकर टिकले प्रचारक गुरुदेव सेवा मंडळ उश्राळ मेंन्ढा श्री.दिलीपजी भानारकर व गावातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते,
 प्रार्थनेवर मार्गदर्शन आदरणीय डॉ.नवलाजी मुळे गुरुजी यांनी केले, ते बोलले कि सामुदायिक प्रार्थना केवळ पापक्षालनासाठी िंकवा व्यक्तिगत उत्कर्षासाठी महाराजांना अपेक्षित नव्हती तर प्रार्थनाही व्यक्तीनिष्ठतेकडून समूहनिष्ठेकडे घेऊन जाणारी असावी, मानव्याच्या शिक्षणाची ती शाळा असावी, सामुदायिक प्रार्थनेची संकल्पना मांडून महाराजांनी गावाचे एकीकरण घडवून आणण्याची प्रक्रिया प्रारंभ केली.
सामुदायिक प्रार्थनेची संकल्पना स्पष्ट करताना महाराज म्हणतात, सामुदायिक प्रार्थना म्हणजे सर्वांनी एक होऊन आपल्या आदर्शानुसारी भाव सर्वशक्तीमान अशा प्रभूजवळ मांडण्याची एक मानवोचित पद्धती ! मानसिक शक्ती व शांती मिळविण्याची एकमव उत्कृष्ट कवायत ! साधारण भौतिकशास्त्र मान्य अशा शारीरिक कवायतींपेक्षाही अतिदक्षतेची ही कवायत आहे. ती भौतिक कवायत फक्त बाहेरच दाखवायची असते, परंतु सामुदायिक प्रार्थनेची कवायत अंतरंग व बहिरंग अत्यंत स्वच्छ व सरळ ठेवून करावयाची असते.सामुदायिक प्रार्थनेचे उद्देश, आवश्यकता, कार्यपद्धती, वैशिष्ट्ये, तात्त्विकस्वरूप या सर्व विषयांवर राष्ट्रसंतांनी ‘विश्वशांतीयोग’ या ग्रंथामध्ये सविस्तर मार्गदर्शन केले आहे. सामुदायिक प्रार्थनेचे उद्देश स्पष्ट करताना ते ‘सामुदायिक प्रार्थना’ फक्त मेल्यावर मोक्ष मिळवून घेण्याकरिता करावयाची नसून सामुदायिकत्व प्राप्त करून देण्यासाठी नि सामूहिक धर्माची ज्योत मनुष्यमात्रांत जागवण्यासाठीच करावयाची आहे.असे अनेक विषयांवर  बोलले आणि चर्चासत्र घेण्यात आली या निमित्ताने गावातील कार्यकर्त्यांनी धान्य व सहयोग राशी रूपात टेकडी येथील वार्षिक कार्यक्रमाला सहयोग दिला,या कार्यक्रमात गावातील कार्यकर्ते अध्यक्ष कौशल्याताई वाघाडे, उपाध्यक्ष वनिताताई गहाणे, सचिव सिंधुताई येसनसुरे
सदस्य-शोभाताई शेंन्डे, पार्वताताई बावणे, वंदनाताई काळसर्प, वंदनाताई बावणे, रेवताताई बोरकर, पेर्मिलाताई दुधकुरे, चंदाताई बावणे, दुर्गाताई डोर्लीकर, निर्मलाताई बोरकर,श्री अनिल जी डोर्लीकर,श्री नरेशजी सदनपवार,श्री मल्लाजी कन्नावार,श्री विठ्ठलजी गजबे, श्री सुखदेवजी मस्के,श्री छत्रपती बोरकर, श्री बाबुरावजी येसनसुरे, श्री हितेश बोरकर, व गावातील सर्व गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित राहुन कार्यक्रमाची सांगता घेऊन पार पाडला,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]