बामणवाडा येथे क्रांतिसूर्य जननायक बिरसा मुंडा जयंतीचा सोहळा संपन्न

बामणवाडा येथे क्रांतिसूर्य जननायक बिरसा मुंडा जयंतीचा सोहळा संपन्न


राजुरा/ प्रतिनिधी 

बामणवाडा येथे क्रांतिसूर्य जननायक बिरसा मुंडा जयंतीचा सोहळा पार पडला असून ट्रायबल  डेव्हलपमेंट कल्चरल फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा श्रमिक एल्गार चे घनशाम मेश्राम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

बिरसा मुंडा चौक राजुरा ते बामनवाडा अशी रॅली काढण्यात आली. राजुरा येथील बिरसा मुंडा चौक येथे अफ्रोट संघटनेच्या वतीने महाप्रसाद देण्यात आले. 

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शिका म्हणून श्रमिक एल्गार च्या संस्थापिका ऍड. पारोमिता गोस्वामी यांनी मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी संघर्षातून आपले हक्क मिळवून आपला सर्वांगीण विकास साधावा तसेच आदिवासी महिला   हिम्मतवान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

उदघाटक म्हणून डॉ. प्रविण येरमे यांनी गोंडीयन बांधवांनी आपली संस्कृती जपण्यासाठी शिक्षणाची जोड द्यावी व आपला सर्वांगीण विकास साधावा, सुसंस्कृत होणे हिच खरी आपल्या थोरांना श्रद्धांजली ठरेल असे सांगत अनेक गाण्यातून आपला इतिहास मांडला, कार्यक्रमात सफल कोटनाके, लोककलावंत रमेश आत्राम यांनी अनेक गोंडी गित सादर केले.  

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. नामदेव कनाके यांनी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या संघर्षावर प्रकाश टाकून ब्रिटिशांच्या होत असलेल्या अन्यायाचा विरोध करण्यासाठी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांनी उलगुलान उभा केला तसेच आदिवासींना धर्मात अडकवून ब्रिटिशांनी कशी फसवणूक केली यावर ते बोलले. 
यावेळी लक्ष्मण कुमरे यांनी मुलाला घडून डॉक्टर बनविले याची दखल गावकऱ्यांनी घेऊन  शुभम कुमरे, व त्यांचा सत्कार करण्यात आला यासोबत दिलीप मडावी,भूमिता मेश्राम यांचाही सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच अविनाश टेकाम, डॉ. मधुकर कोटनाके, लोकनेते वाघुजी गेडाम, धिरज मेश्राम, बाळकृष्ण मेश्राम, 
निशा कनाके उपस्तीत होते. तर गावातील प्रतिष्ठित नागरिक जगदीश पाल, धर्मु नगराळे प्रामुख्याने कार्यक्रमात उपस्तीती दर्शविली. 
कार्यक्रमाचे संचालन लोमेश मडावी, दिपक मडावी यांनी केले तर तर प्रास्ताविक घनश्याम मेश्राम यांनी केले 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राकेश कोडापे, नागु टेकाम, सौ. भाविका मेश्राम, गंगा टेकाम, दिलीप मडावी,मधुकर कोडापे, प्रदिप टेकाम, गणेश कोडापे, मोरेश्वर टेकाम, जालिंदर टेकाम, नितेश टेकाम, बंडू कोडापे,   यासह इत्यादींनी परीश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]