तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत विश्व ज्योती कान्हेट तळोधी बा. संघ विजेता

तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत विश्व ज्योती कान्हेट तळोधी बा. संघ विजेता

तळोधी बा. 
      नागभीड तालुक्यात होवू घातलेल्या तालुका क्रीडा संकुल मध्ये १४ वर्ष वयोगटातील मुलीसाठी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तळोधी बा. येथील विश्व ज़्योती कान्हेट स्कूल येथील विद्यार्थीनी कु. खुशबू सेलोकर,अक्षरा पोशट्टीवार, सलोनी अगडे, ज्ञानेश्वरी मांडवटर,चानाशी मिसार, श्रावणी कामडी,तुलशी कावळे, स्वराली कामडी, रिद्धी सोनवणे, इशिका घावळे,डोयल कामडी, या १४ वर्ष वयोगटातील मुलीनी कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून अंतीम सामन्यात लोकविदयालय तळोधी बा. संघाचा पराभव करून तालुक्यातून प्रथम विजेता ठरले. व जिल्हास्तरीय होवू घातलेल्या कबड्डी स्पर्धेत विश्व ज़्योती कान्हेट स्कूल निवड झाली. प्रथमच मुलींनी कबड्डी स्पर्धेत विजेता संघ झाल्याने शिक्षक प्रविण मोहुलै , शिक्षिका रिंकू पिसे यांचे सुध्दा कौतुक करण्यात आले. यावेळी विश्व ज़्योती कान्हेट स्कूल चे प्राचार्य अनीट जोश , उपप्राचार्य सिस्टर रेसबीन यांनी विजेता संघाचे व कबड्डी खेळाडू शिक्षक यांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ व शिल्ड देऊन गौरवण्यात आले.तालुका स्तरावर मुलीने प्रथम विजेता पद मिळवून जिल्हा स्थळावर मुलींना खेळण्यासाठी संधी मिळाल्याबद्दल पालक वर्गाने शिक्षक वुंद, प्राचार्य, व विजेता संघाचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]