नांदगाव परिसरात शेळ्या मेंढ्यांवर रोगांचा प्रादुर्भाव - मेंढपाळ आर्थिक संकटातमुल (प्रतिनिधी)
नांदगाव येथे शेळ्या मेंढ्यांवर विविध आजार असल्यामुळे अनेक जनावरे मृत्यू पावत आहेत यामुळे कुरमार जातीतील मेंढपाळ आर्थिक संकटात सापडले आहेत. 
       मुल तालुक्यात धनगर कुरमार समाजाकडे फार मोठ्या प्रमाणात शेळ्या मेंढ्या असून त्यांचा मेंढीपालन हा प्रमुख व्यवसाय आहे. मेंढपाळ  मुसळधार पावसात, विजेच्या कडकडाटात, पूर परिस्थितीत, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा या सर्व ऋतूमध्ये बाहेर उघड्यावर असतात. वाघ, बिबट,लांडगे शा हिंस्त्र प्राण्यांच्या भयात,  साप विंचू अशा ठिकाणी रात्र काढतात, पावसामुळे स्वयंपाक करता येत नाही त्यावेळी उपाशी दिवस काढतात अशा भयानक परिस्थितीत मेंढपाळ आपली उपजीविका भागविण्यासाठी आपल्या मेंढपाळ व्यवसाय करीत असतात. परंतु सद्या नांदगाव येथील विस्तारी कनावार व रमेश मंडलवार यांच्या शेकडो मेंढ्यां विविध आजाराने मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे आर्थिक संकट कोसळले आहे. पशु विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी मेंढपाळ करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]