पळसगाव(खुर्द) तंटामुक्त समितिच्या पुढाकाराने अवैद्य दारू विक्रेता अटकेत

पळसगाव(खुर्द) तंटामुक्त समितिच्या पुढाकाराने अवैद्य दारू विक्रेता अटकेत


तळोधी (बा.) 
नागभिड पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पळसगाव(खुर्द) येथे अवैद्य दारू विक्री जोमात सुरू होती.या गावात तिन अवैद्य दारू विक्रेते दारुचा व्यवसाय करित आहेत. त्यातील एका दारु विक्रेत्याला आज तंटामुक्त गाव समिती च्या पदाधिकार्यांनी पकडुन पोलिसांचे स्वाधिन केल्याने विक्रेत्याचे धाबे दणाणले असुन तंटामुक्त समितिच्या या कार्याचे गावकऱ्यांनी अभिनंदन केले आहे. गावात अवैध देशीदारु विक्रेता दिवाकर दागोजी डाहारे वय ४५ वर्ष हा अवैध दारुचा व्यवसाय करित होता.यांची गुप्त माहिती तंटामुक्त समितिच्या पदाधिकार्यांनां मिळाली असता तंटामुक्त समितिचे अध्यक्ष मिलिंद मेश्राम, निमंत्रक व पोलिस पाटिल  प्रविण रामटेके,यांचे पुढाकाराने इतर समितीचे सदस्यांनी या अवैध देशीदारु विक्रेत्याला मुद्देमालासह पकडुन पोलिसांचे स्वाधिन केले.यावेळी नागभिड पोलिस स्टेशन चे हेडकास्टेबल वारजुरक यांनी पोलीस कारवाई केली.यावेळी तंटामुक्त समितिचे सदस्य सोमाजी वरठी, जगदिश गुतिंवार, नरेंद्र शेन्डे, ग्र.प.सदस्य युवराज सिडाम, रमेश नारमलवार, गोकुल मांदाडे, बाबुराव ताडाम, कॄष्णा शेंडे, प्रकाश बावनकर, नानाजी शेंडे इत्यादी समितीचे सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]