चंदई नहराची दुरुस्ती करा.. परिसरातील शेतकऱ्यांची मागणी...

चंदई नहराची दुरुस्ती करा..
परिसरातील शेतकऱ्यांची मागणी

शेगाव..जगदीश पेंदाम

 शेगाव येथून जवळच असलेल्या रामदेगीकडे जाणार रस्त्यावर निमडला तलाव असून  याला लागुनच चंदई नहर असून येथील पाणी नहराद्वारे परिसरातील,अर्जुनी, तुकुम,कोकेवाडा, तुकुम, किनाळा आष्टा,मानकर कोकेवाडा,विलोळा,वडाळा, काटवल येथील गावातील शेतकऱ्यांना शेती उपयोगी असून त्याच्या याचा फायदा शेतकरी घेत असतो या अंतर्गत जवळपास सहा हजार हेक्टर जमीन ओलीता खाली येत आहे..
हा नहर 40 वर्षाच्या अगोदर याचे बांधकाम करण्यात आले मात्र अजून पर्यंत याची दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बगदाड पडले असून तसेच नहरामध्ये गवत, कचरा मोठ्या प्रमाणात तयार झाले असल्याने शेतकऱ्यांना  पाण्याचा उपयोग होत नाही आहे.या नहराचे पाणी 20 km अंतर पर्यंत सोडले जात असून शेतकरी  दरवर्षी पाणी सारा कर वसुली देत असतात परिसरातील शेतकऱ्यांना शेती पिके घेत असतात पाणी पुरवठा करणे संबंधित विभागाकडून आवश्यक आहे, जवळपासच्या शेतकऱ्याकडून पाणी वापरले जाते परंतु शेवटच्या टोकापर्यंत असलेल्या शेतकऱ्यांना याचे पाणी मिळत नसल्याने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून ठीक ठिकाणी पडलेले भगदाळ ,कचरा दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्याकडून करण्यात आली आहे...

निमडला तलाव हा शेगाव परिसरातील एक मोठा तलाव आहे  या तलाव मध्ये कोळी बांधव मच्छी व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत असून या तलावातून कोळी बांधवांना मोठा रोजगार  मिळत असतो..
तसेच तीर्थक्षेत्र असलेली रामदेगी येथे जाण्याकरता या तलावा जवळून जावे लागते या तलावामध्ये  हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी पक्षी येत असून निसर्ग प्रेमी तलावाचा आनंद व पर्यटक म्हणून रामदेगी मध्ये येणारे नागरिक आनंद लुटत असतात..
या चंदई नहराची व तलावाची सिमा ताडोबा राष्ट्रीय उद्यान ला लागून असल्यामुळे जंगली प्राणी वाघ, अस्वल,बिबट, चितळ,जगंली डुक्कर, सांबर, नीलगाय आदी प्राणी सुद्धा पाणी पिण्यासाठी याच्या वापर करत असून उन्हाळ्यामध्ये भासत असलेल्या पाणीटंचाईला याच्या फायदा होण्यास मदत निर्माण होईल, तसेच परिसरातील गावातील शेतकऱ्यांचे जनावरांना सुद्धा पिण्यास उपयोग होईल...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]