टेकाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ववत सुरू करा - माजी सभापती विजय कोरेवार यांची मागणी

टेकाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ववत सुरू करा - माजी सभापती विजय कोरेवार यांची मागणीअन्यथा आंदोलनाचा इशारा
सावली -(प्रतिनिधी)
 टेकाडी ग्रामीण पाणीपुरवठा योजना बंद पडलेली आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असल्याने ती योजना पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांनी प्रशासनाकडे केली आहे. सुरळीत पाणी पुरवठा न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
वैनगंगा नदीवरील हरणघाट येथून टेकाडी ग्रामीण प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा पाणी पुरवठा केला जातो. येथिल पाणी कवठी, पारडी, रुद्रापूर, चांदापुर, खेडी, चांदली बूज, टेकाडी या गावांना पुरविल्या जाते मात्र मागील सहा महिन्यांपासून पाईप लाईन लिकेज असल्यामुळे महिन्यातुन पंधरा दिवसही पाणी पोहचत नाही, आता तर पाणी पुरवठाची थकीत बिलामुळे वीजच महावितरणने कपात केली आहे.
शासन "हर घर नल, हर घर जल" अभियांनातर्गत प्रत्येकाला मोफत पाणी पुरविण्याचा संकल्प केला आहे मात्र इथे जे स्रोत आहे त्यांचेकडे प्रशासन दुर्लक्ष करीत ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचे पाण्यापासून वंचित ठेवत आहे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे टेकाडी ग्रामीण प्रादेशिक पाणी योजना तात्काळ पूर्ववत सुरू करावी अशी मागणी माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांनी गटविकास अधिकारी सावली व उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांचेकडे निवेदनातून केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]