दगडाने ठेचून केलेल्या हत्या प्रकरणी दोन आरोपी पकडण्यात पोलिसांना यश.....

दगडाने ठेचून केलेल्या हत्या प्रकरणी दोन आरोपी पकडण्यात पोलिसांना यश.....
शेगाव...जगदीश पेंदाम

 शेगाव येथून जवळच असलेल्या चारगाव बू ते वायगाव भो. मार्गावर वनविभागच्या तपासणी नाक्याजवळच झाडाच्या झुडपाआड एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला असल्याने याची हत्या अज्ञात अनोळखी आरोपीने केली असल्याने या हत्याचा उलगडा करणे स्थानिक संबधीत पोलिसांना तारेवरची कसरत होती परंतु यावर अधिक लक्ष केंद्रित करून पोलिसांनी तीन दिवसात याचा उलगडा करून अखेर दोन आरोपीला अटक केले.. 
या खूना मुळे हत्ते प्रकरणी गावात तसेच परिसरात खडबड उडाली  भीती निर्माण झाली होती  सदरची माहिती स्थानिक शेगाव बू पोलीस स्टेशन शेगाव चे ठाणेदार  अविनाश मेश्राम यांना मिळताच घटनास्थळ गाठून  पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा , उप विभागीय पोलीस अधिकारी वरोरा  आयुष नोपानी, पोलीस अधीक्षक रविंदरसिंह संतोषसिह परदेशी , यांनी तात्काळ घटनस्थळ गाठून आपले चौकशी चक्र फिरवले होते.
  तेव्हा मृतक अनोळखी व्यक्तीची ओळख पटवण्यात यश प्राप्त झाले मृतक नाव  तुळशीराम  तुकाराम महाकुळकर वय अंदाजे साठ वर्षे राहणार भेंडाळा असे स्पष्ट झाले त्यानंतर पोलीस अधीक्षक रवींद्रसिह परदेशी यांनी सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपीचा शोध लावण्याचे आदेश दिले  . त्यावरून पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश भोयर व जितेंद्र बोबडे , यांच्या नेतृत्वाखाली  दोन पथक तयार केली ... सदर ची घटना रात्रीची असल्याने घटनेच्या ठिकाणी कोणतेही तांत्रिक पुरावे सापडले नव्हते . तसेच घटना स्थळा पासून लोक वस्ती देखील दूर होती. त्यामुळे पोलिसांना अनोडखी आरोपीचा शोध घेणे कठीण होते . परंतु  पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे व सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश भोयर व त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी आपले कौशल्य दाखवून आरोपीचा शोध घेण्याचा निर्धार केला . मयाताचा खून करण्या मागील उदेश समजून येत नव्हता. तरी देखील आपले कौशल्य प्राण प्राणाला लाऊन तीन दिवसात अखेर आरोपीचा शोध घेतला . यात दोन आरोपी सौरभ प्रकाश हिवरे रा. चारगाव बू. वय 22 वर्ष  तर अतुल मधूकर मडकाम रां. जाम ता. समुद्रपुर जी. वर्धा , ह. मू. चारगाव बू. यांना ताब्यात घेऊन केलेल्या गुन्ह्याचा उलघडा केला .. 
             त्यांच्या कडे गुन्हा समंधाने कौशल्यपूर्वक उलट तपासणी केली ते निरुत्तर झाल्या नंतर संशय बळकावला त्यावरून त्यांच्या कडे अधिक चौकशी केली असता. या दोघांनी मिळून सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले त्यावरून पुढील तपास शेगाव पोलीस स्टेशन चे अधिकारी अधिक तपास करीत आहे .
   सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिह परदेशी , अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे , पोलीस हवालदार  धनराज करकाडे, संजय आतकुलवर, प्रकाश बल्की, नितीन साळवे, स्वामिदास चालेकर , अजय बागेसर , चंदू नागरे , संदीप मुळे , प्रशांत नागोसे , प्रांजल झिलपे , कुंदनसिंह बावरी , अमोल धंदरे , महिला अमालदर निराशा तीतरे , वाहन चालक  प्रमोद डंभारे , दिनेश अराडे इत्यादींनी  आरोपी पकडण्यात मोलाचे सहकार्य केले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]