उश्राळ मेंढा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते इमारतीचे लोकार्पण लोकनियुक्त सरपंच यांनी एका वर्षाच्या आत केला शब्द पूर्ण

उश्राळ मेंढा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते इमारतीचे लोकार्पण
लोकनियुक्त सरपंच यांनी एका वर्षाच्या आत केला शब्द पूर्ण
    चंद्रपूर जिल्ह्यात व नागभीड तालुक्यात सर्वात प्रथम महिलां ग्रामसंघाकरिता प्रशस्त ईमारत ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत तयार करून देण्यासाठी उश्राळ मेंढा येथील लोकनियुक्त सरपंच श्री हेमराज लांजेवार यांनी महिला ग्रामसंघाला शब्द दिला आणि त्या शब्दाची पूर्तता करीत मा श्री विवेक जॉन्सन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आला, महिला सबलीकरण करिता शासन विविध पद्धतीने प्रयत्न करीत असतात, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही आणि महिला मागे राहतात परंतु त्याना स्वतःच एक व्यासपीठ मिळावे त्यांना एकजूट करून त्यांना त्यांची कौशल्य साधण्याची संधी मिळावी व त्यांचे बळकटीकरण व्हावे यासाठी गावागावात महिला ग्रामसंघ उभारण्यात आलेले आहेत, त्यांना स्वतःची इमारत हवी यासाठी सर्व महिलांनी महिला ग्रामसंघाला ईमारत हवी यासाठी मागणी केली आणि लोकनियुक्त सरपंच हेमराज लांजेवार यांनी एका वर्षाच्या आत ईमारत तयार करून दिली.
    या उद्घाटन सोहळ्यासाठी विवेक जॉन्सन मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर, खोचरे मॅडम संवर्ग अधिकारी नागभीड लोकनियुक्त सरपंच हेमराज लांजेवार उपसरपंच जयेश लोंढे,अमोल बावनकर सरपंच येणोली,दिलीप गायकवाड सरपंच गंगा सागर हेटी ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक व गावातील नागरिक आणि ग्रामसंघाचे सर्व महिला उपस्थित होत्या यावेळी सर्व पाहुण्यांचे स्वागत महिला मंडळींनी केले आणि ईमारत तयार करून दिल्याबद्दल लोकनियुक्त सरपंच हेमराज लांजेवार यांचे आभार मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]