प्रेमाला धर्म नसतो पण...!

प्रेमाला धर्म नसतो पण...!


🔷 प्रेम म्हणजे नेमंक काय...?
             खऱ्या अर्थाने प्रेम ही जगातली सगळ्यात निर्मळ भावना आहे.त्यामुळे प्रेमाला कुठलीच मर्यादा नसते.आणि त्याही पलीकडे जाऊन सांगायचं झाल्यास प्रेमाला कुठलाही धर्म नसतो.कारण प्रेम हे एका मनाने दुसऱ्या मनावर केलेलं असतं.जर वैज्ञानिक दृष्ट्या आपण बघितलं तर सर्व धर्मातल्या माणसांची रचना सारखीच आहे.त्यामुळे निश्चितच मानवी मन म्हटलं की ते सर्वांचं सारखच असणार त्यामुळे मनालाही कुठला धर्म नसतो हेही तितकंच सत्य.
              त्यामुळेच की काय प्रेमाला कधीच कुठल्या रंगाची,कुठल्या वर्णाची,आणि कुठल्याच धर्माची भाषा कळत नाही प्रेमाला फक्त प्रेमाची भाषा कळते.आणि म्हणूनच कुणीतरी फार छान आणि मार्मिक विधान केलं आहे "प्रेमानेच मनं जिंकता येतात आणि प्रेमानेच जग जिंकता येत." आता हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे की,आपल्याला मनं आणि जग कुठल्या प्रकारे आणि कश्यासाठी जिंकायचे आहे.कारण प्रेमामध्ये माझं तुझ,याच त्याच अस काहीच नसतं तर प्रेमात सगळं आपलं असतं.आणि म्हणूनच की काय आपल्या मनावर कुणीतरी प्रेम करावं अस जर आपल्याला वाटत असेल तर आपलं मन सुद्धा तितक्याच ताकदीेच,तितक्या जाणीवेच आणि तितक्याच प्रगल्भतेच असावं लागतं.हे ही तितकंच खरं.
          जर प्रेमासारख्या निर्मळ भावनेचा वापर करून जर धार्मिक उद्दिष्टे साध्य केले जात असतील, धार्मिक कट रचले जात असतील तर नक्कीच ते क्रूर कृत्य आहेत असं म्हणावं लागेल.तुमच्या ही लक्षात आलच असेल की मी नक्की कष्याबद्दल बोलतोय.
   नुकतीच मुंबई मधील श्रध्दा वालकरची आपल्याच प्रियकराच्या हातून अत्यंत क्रूरपणे हत्या होते आणि "दिल्लीचं श्रद्धा प्रकरण" ही घटना नावारूपास येते.

🔷 काय आहे श्रद्धा वालकर प्रकरण...?
थोडक्यात ते प्रकरण अस की मुंबई मध्ये राहणारी श्रद्धा वालकर आणि आफताब या दोघांची 2019 मध्ये भेट झाली.त्यानंतर मैत्री आणि पुढे मैत्रीचं रूपांतर प्रेमात.जेव्हा हे प्रेमप्रकरण श्रद्धा आपल्या घरी सांगते तेव्हा घरचे मुलगा मुस्लिम आहे म्हणुन विरोध करतात.पण आई वडिलांच्या विरोधाला विरोध करत श्रद्धा घर सोडून आफताब सोबत राहायला लागते.त्यानंतर ते मुंबई सोडून 1 मे 2022 ला दिल्लीला राहायला जाते. आणि पोलीस चौकशी नुसार 15 मे 2022 ला आफताब काही कारणास्तव तिची हत्या करतो आणि तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून एक एक तुकडा प्लॅस्टिक मध्ये भरून रोज जवळच्या जंगलात फेकत असतो. आणि महत्वाचं म्हणजे ती आफताब सोबत "लिव्ह इन रिलेशनशिप" मध्ये असते.पण जेव्हा श्रद्धा च्या वडिलांच्या लक्षात आलं की श्रद्धा शी कुठलाही प्रकारे संपर्क होत नाही आहे तर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.आणि चार दिवसाखाली बातमी येते की. "श्रद्धा वालकर हीची तिच्याच प्रियकराने हत्या करून तिच्या देहाचे केले 35 तुकडे..."
हत्या का केली..? कधी केली...? मग त्या जनावराला कोणती शिक्षा व्हायला पाहिजे...? या सगळ्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी आणि न्याय देण्यासाठी पोलीसयंत्रणा आणि न्यायपालिका आहे.
      पण या प्रकरणावर सगळेच जण संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.काहींच्या मते हा प्रेमाचा विश्वासाचा घात आहे.तर काहींच्या मते हत्या म्हणजे "लव्ह जिहाद" ला श्रद्धा ने केलेल्या विरोधामुळे झाली आहे.

🔷 लव्ह जिहाद म्हणजे काय..?
भारतीय कायद्यात कुठेच लव्ह जिहाद ची व्याख्या दिली नाही.लव्ह जिहाद ही संकल्पना सर्वप्रथम केरळ आणि तामिळनाडू मध्ये वापरली गेली. मुस्लिम समुदायातल्या मुलाकडून इतर समुदयातल्या मुलीशी लग्न करवून तिचे धर्मपरिवर्तन करून तिला इस्लाम मान्य करायला लावणे.
ही झाली लव्ह जिहाद ची सर्वसाधारण व्याख्या.
१२ सप्टेंबेर 2021 रोजी मध्यप्रदेश मधील पूजा पटेल ह्या मुलीने आपल्या सासरी स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली. कारण एकच नवऱ्याने इस्लाम धर्म स्वीकारायला केलेली बळजबरी..
अश्या अनेक लव्ह जिहाद च्या घटना आपल्याला भारतात घडलेल्या पाहायला मिळतील.

🔷 श्रध्दा "लव्ह जिहाद" ला बळी पडली का...?
भारतात दर वर्षी लव्ह जिहाद ची प्रकरण कानावर येतात.आणि या मुळेच की काय कित्येक हिंदू मुलींना आणि इतरही समुदायातील मुलींना प्रेमाची साथ देऊन,फक्त आणि फक्त धर्माच्या नावाखाली आपला जीव गमावावा लागतो. कारण त्यांनी धर्मांतर करायला विरोध केलेला असतो.मग श्रद्धा वालकर ची हत्या सुद्धा धर्माच्या नावाखालीच झाली आहे का..? असा प्रश्न आपल्याला पडतो.पण पुर्ण पने चौकशी झाल्या शिवाय आपण सुद्धा याबाबत काहीच बोलू शकत नाही.संबंधित प्रकरणाची चौकशी दिल्ली पोलीस आणि मुंबई पोलीस करत आहेत.

🔷 मुस्लिम समुदायातील कुठल्याही मुलाने जर इतर समुदायातील मुलीशी विवाह केला तर तो प्रत्येक विवाह "लव्ह जिहाद" च होईल का...?
      तर याच साधं आणि सरळ उत्तर आहे नाही...
कारण विवाह करण्यासाठीं एक सच्चा जोडीदार लागतो. तो कुठल्या धर्माचा आहे किंवा तो कुठल्या जातीचा आहे हे महत्त्वाचं नसतं.कारण आज कित्येक जोडपे असे आहेत ज्यामध्ये मुलगा मुस्लिम आणि मुलगी हिंदू आहे.आणि महत्त्वाचं म्हणजे ते गुण्या गोविंदाने नांदत सुद्धा आहेत.
तन्वीर अहमद या मुस्लीम व्यक्तीने विनिता शर्मा या हिंदू स्त्रीशी लग्न केले आहे. त्यांना कुहू नावाची एक गोड मुलगी आहे. ते सुखी व आनंदी जीवन जगतात आणि लोकांकडून अपेक्षा व्यक्त करतात की, त्यांचा विवाह धर्मनिरपेक्ष भारतातील एक आदर्श विवाह असेल. (बीबीसी न्यूज, २०२०) 
यासारखी अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील
पण या पवित्र सोहळ्यामध्ये जर जबरदस्ती धर्मांतराचा कट रचल्या जात असेल तर नक्कीच माझा सुद्धा अश्या विवाहांना विरोध असेल.परंतु माझा आंतरजातीय विवाहांना विरोध नसेल.म्हणून आजपर्यंत मुस्लिम मुलांनी इतर समुदायातील मुलींशी केलेल्या आणि इथून पुढे होणाऱ्या विवाहावर लव्ह जिहादचा शिक्का मारणं सर्रास चुकीचं आहे.याने फक्त एक गोष्ट होईल ती म्हणजे देशात धार्मिक तेढ निर्माण होईल, आणि याचा फायदा राजकारणी घेतील आणि मला अस वाटतंय की आता तो फायदा ते घेत सुद्धा आहेत बस्स याच्या पलीकडे काहीच होणार नाही.

🔷 श्रद्धा वालकर प्रकरणात नेमका घात कुणाचा...?
           हृदय पिळवटून टाकणाऱ्या हा हत्येची बातमी कानी पडली तेव्हा मला सहज विचार आला की यात नेमका घात कुणाचा झाला...? 
आई वडिलांनी आपल्या मुलीवर ठेवलेल्या विश्वासाचा. श्रद्धाने आईवडिलांचा विरोध न जुमानता आफताब शी केलेल्या प्रेमाचा की स्वतः श्रद्धाचाच...? यामध्ये ह्या सगळ्यांचाच घात झाला.आणि महत्त्वाचं म्हणजे प्रेमासारखी निर्मळ भावना पुन्हा एकदा कलंकित झाली. कारणकी प्रेम म्हटलं की विश्वास,काळजी,आदर,विचार,भावना,समर्पण या सगळ्या गोष्टी जिथे असतात तिथेच प्रेम जिवंत असतं.पण यामध्ये आपल्याला या गोष्टी कुठच दिसत नाहीत.आणि म्हणूनच की काय प्रेमला साथ देणाऱ्या श्रद्धाचा शेवट इतक्या क्रूरतेने झाला.
म्हणून शेवटी एवढंच की प्रेम करावं किंवा नाही, जोडीदार आपल्या मनाने निवडावा की आईवडिलांच्या म्हणण्यानुसार निवडावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे..
पण जोडीदार निवडताना मात्र स्वतः विचार करणे फार महत्वाचं...!!
             ✍️ नामदेव अंकुश देवकते
                फर्ग्युसन महाविद्यालयात पुणे
                   द्वितीय वर्ष - अर्थशास्त्र
                    मो. 7743887134

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]