भेकरची शिकार करून मांस शिजविणाऱ्या नऊ जणांना अटक


सामदा येथील घटना : आरोपींची जिल्हा कारागृहात रवानगी
सावली : (प्रतिनिधी)
अधिसूचित वन्यप्राणी भेकरची शिकार करून मांस शिजविल्याप्रकरणी वन अधिकाऱ्यांनी सावली उपक्षेत्र व्याहाड नियतक्षेत्रअंतर्गत सामदा येथे शुक्रवारी नऊ जणांना अटक केली. महादेव सावजी पोहनकर, सिद्धार्थ परशुराम रामटेके, राकेश कचरू भोयर, अमोल दिवाकर खेवले, गिरीधर देवाजी रामटेके, श्रावण कावरू शेंडे, रामदास सदू भोयर, योगेश हरिदास साखरे, श्रावण बुधा साखरे (सर्व रा. सामदा, ता. सावली) अशी आरोपींची नावे आहेत.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाल्याने सामदा येथील महादेव सावजी पोहनकर याच्या घरी जाऊन झडती घेतली असताना वन्यप्राणी भेकरचे शिजलेले मांस घरी आढळले. आरोपीची सखोल चौकशी केली असता सामदा येथील अंजना कवडू भांडेकर यांच्या पडीक शेतात आरोपीने शनिवारी दुपारी २ ते २. ३० च्या दरम्यान वन्यप्राणी भेकरची शिकार केली. त्यानंतर मांस शिजवून खाण्यासाठी घरी आणले. चौकशीदरम्यान या प्रकरणात अन्य आठ आरोपींचा सहभाग असल्याचे उघडकीस आले. घटनास्थळाचा पंचनामा करून मांस ताब्यात घेतले आणि एकूण नऊ आरोपींविरूद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये वन गुन्हा नोंदवून एकूण नऊ जणांना अटक केली. आरोपींना तालुका न्यायालयात हजर केले असता प्रथम श्रेणी न्यायाधीशांनी २ डिसेंबर २०२२ पर्यंत पाेलीस कोठडी सुनावली.

ही कारवाई विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदु) एन. जे. चौरे, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) व्हि. ए. राजुरकर, क्षेत्र सहायक व्याहाड, वनरक्षक आदींनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]