जांभुळघाट येथेल जि.प.शाळा व मधूवन विद्यालय येथे चोरी

जांभुळघाट मध्ये अवैध धंद्या बरोबर चोरीच्या प्रमाणात वाढ

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमुर : - जांभुळघाट येथे भामट्या चोरा द्वारे जि.प.शाळेचा लॉक असलेला ताला तोडून चोरी करण्यात आली असुन त्याची तक्रार भिसी पो.स्टी.ला करण्यात आली आहे.दिवाळी च्या सुट्या मध्ये ही चोरी झाली असावी असा मुख्याध्यापक याचे कडून माहीती देण्यात आली आहे.हि घटणा दिनांक.०५/११/२०२२ ला उघड झाली.गावातील नागरीकांनी मुख्याध्यापकास चोरीची माहीती दिल्या नंतर येऊन चौकसी केली असता ३ बँड चोरीला गेल्याची घटना समोर आली.१५ दिवस अगोदर मधूवन विद्यालय जांभुळघाट येथील शुध्दा याच पध्दती ने चोरी करण्यात आली होती.कॉम्पूटर सह साहित्य चोरी झाली होती. पो.स्टे.भिसी येथे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. हि सुध्दा चौकसी चालु असल्याची माहीती मिळाली पण चोरी कोणी केली व त्या आरोपीला अजुन पर्यंत पकडण्यात आले नाही. जांभुळघाट येथे अवैध दारू,सट्टा व जुव्याच्या व्यसनामुळे चोऱ्या करण्याच्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे.छोटा गुन्हेगार हा समोर मोठा गुन्हेगार होऊ नये यासाठी योग्य वेळी पोलीस विभागा कडून योग्य कार्यवाही झाली तर कोणत्याही प्रकारी पुढे चोरी करणाऱ्याची चोराची हिम्मत होणार नाही.काही दलाल किंवा हूशार लोकांमुळे पोलीस सुध्दा सेटींग करीत असतात.त्यामुळे अवैध धंदे असो कि चोरी यात सातत्यानी वाढ होताना दिसत आहे.या चोऱ्यामुळे व्यावसायिक दुकाणदार यांच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलीस प्रशास कडून तात्काल कार्यवाही करून चोरट्यास अटक करण्यात यावी अशी जांभुळघाट येथील स्थानिकांडून मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]