मुख्यमंत्र्याच्या सभेमध्ये दोनशे रुपये रोजी देऊन आणल्या महिलाजिल्ह्यात चर्चेला आलं उत

मुख्यमंत्र्याच्या सभेमध्ये दोनशे रुपये रोजी देऊन आणल्या महिलाजिल्ह्यात चर्चेला आलं उततालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - भंडारा येथे आज दिनांक.१२/११/२०२२ ला झालेल्या मुख्यमंत्र्याच्या सभेला मोठी गर्दी दिसावी म्हणून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी दोनशे रुपये रोजी देऊन ग्रामीण भागातील महिलांचा जमाव करून सभेला गर्दी वाढविण्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रकाशित झाला.या सर्व प्रकारामुळे सगळीकडे भंडारा जिल्ह्यामध्ये शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातील शेतकरी महिलांना पैसे देऊन गर्दी करण्याचा देखावा निर्माण केल्याची चर्चा सर्वत्र भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रंगली असे दृश्य दिसायला सुरवात झाली.भंडारा येथे दोनशे कोटी रुपयांची विकास कामे यांचे भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच भंडारा येथे आले त्यांच्या जाहीर सभेला जनतेची गर्दी दिसावी म्हणून सभेला
येण्याजाण्याचा खर्च त्याचप्रमाणे वाहनांची सोय करण्यात आली व त्या व्यतिरिक्त प्रती महिला २०० रुपये या दराने सभेच्या स्थळी महिलांची गर्दी जमविली. याची संपूर्ण महाराष्ट्रात ठिक - ठिकाणी बघावे तिकडे चर्चा सत्र सुरू आहे.मंत्र्यांचा दौरा आणि आमदारांचे लक्षणीय कार्याची कौतुकास्पद चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगू लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]