घाटकुळ येथे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाची जय्यत तयारी : १२ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन
 विविध परिसंवादाच्या  विचार मंचास दिवंगत गुरुदेव सेवकांचे नाव  देऊन त्यांच्या कार्याचे स्मरण  

चंद्रपूर ( प्रतिनिधी)- 
घाटकुळ (ता पोंभुर्णा  जि. चंद्रपूर) येथे राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे १८ वे  राष्ट्रसंत साहित्य विचार कृती संमेलन घाटकुळ ग्रामस्थांच्या सहकार्याने येत्या १२ व १३  नोव्हेंबरला होत असून या संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यावर आलेली आहे. संमेलनाचे उद्घाटन चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सांस्कृतिक मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.तर संमेलनाध्यक्ष डॉ. नामदेव कोकोडे आहे.  सकाळच्या राष्ट्रसंत साहित्य दिंडी नंतर दुपारी बारा वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. आयोजन समितीनी वेगवेगळ्या स्तरावर जय्यत तयारी केलेली असून विविध  कार्यानुरूप  गट तयार केलेले आहे.  नागरिकांनी स्वच्छता अभियान, घर  सजावट, प्रचार प्रसार यावर विशेष लक्ष दिलेले आहे. राष्ट्रसंत साहित्य दिंडी ,उद्घाटन समारंभ, परिसंवाद ,प्रबोधन संध्या, सामुदायिक प्रार्थना आणि  ध्यानपाठ, सप्तखंजिरी कीर्तन,  कवीसंमेलन , समारोप असे विविधांगी कार्यक्रम या संमेलनात असणार आहे.  विशेष म्हणजे  संमेलन समितीने कोरोना काळात निधन झालेल्या  दिवंगत श्रीगुरुदेव सेवकांचे नांव विविध विचारमंचास देऊन   त्यांच्या कार्याचे स्मरण केलेले आहे.  'गाव हा विश्वाचा नकाशा !  गावावरून देशाची परीक्षा ' या महत्त्वपूर्ण परिसंवादास  ज्येष्ठ समाजसेवी दिवंगत पुरूषोत्तम पाटील हिरादेवे (बाखर्डी)  यांचे नाव देण्यात आले. तर  प्रबोधन संध्या क्र.२  या कार्यक्रमास  ज्येष्ठ प्रबोधनकार दिवंगत उद्धवजी शिंगाडे महाराज (माजी आमदार) यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याला वंदन केलेले आहे. विशेष म्हणजे माजी आ. शिंगाडे यांनी राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या एकूण दहा संमेलनात हजेरी लावून आपली कीर्तन सेवा रुजू केली होती . नानाजी डोंगे (साखरी) या दिवंगत  समाजसेवी गुरुदेव सेवकांचे नाव अनुभव कथन या परिसंवादास दिलेले आहे.यापूर्वीच्या अनेक साहित्य संमेलनात त्यांनी आपली सेवा अर्पण केलेली  होती  तर कोरोना काळात  स्वयंस्फूर्तीने अनेक गावे झाडणारे राजुरा तालुक्यातील गाडगेबाबा म्हणून प्रसिद्ध होते असे चंपत पाटील कावडकर यांचे नाव संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रास अर्थात स्वच्छता अभियानाला दिलेले आहे. त्यानंतरच्या योगासने आणि प्राणायाम मार्गदर्शन कार्यक्रमास  गोसेवक तथा ग्रामसंरक्षण दलाचे कार्यकर्ते  दिवंगत तेजरामभाऊ बगमारे (कसारला) यांचे नाव दिले आहे. तर कवी संमेलनाच्या विचारपिठास ज्येष्ठ कवी तथा सुप्रसिद्ध साहित्यिक दिवंगत डॉ.किसन पाटील( जळगाव) यांचे नाव दिलेले आहे. डॉ.किसन पाटील यांनी राष्ट्रसंत विचार साहित्य  परिषदेनी कोरोना काळात आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात आँनलाईन व्याख्यान दिलेले होते तसेच ते  सातत्याने राष्ट्रसंतांच्या कार्यानुरूप लेखन करीत होते. त्यांच्याही कार्याचा स्मरण आयोजन समितीने केलेले आहे.प्रबोधन संध्या क्र.१  या कार्यक्रमास  अडेगाव येथील दिवंगत ज्येष्ठ गुरुदेव सेवक मारोती पाटील ठाकरे यांचे नाव दिलेले आहे . त्यांनी अडेगाव ता. झरीजामणी  (जि.यवतमाळ) येथे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाच्या आयोजनात मोठे योगदान दिले होते. तसेच ते  स्वतः ग्रामगीता आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे उत्तम प्रचारक होते.  तर समारोपीय कार्यक्रमास चंद्रपूर चे ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ दिवंगत विजय मार्कंडेवार यांचे नाव दिलेले आहे. विजय मार्कंडेवार  यांनी अनेकदा राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात हजेरी लावून आपली ज्ञानदान सेवा दिलेली होती. सेवा मंडळाचे अनेक कार्यक्रमात ते सहभागी झाले होते.  त्यांच्याही कार्याचे स्मरण संमेलनाच्या निमित्ताने करण्यात येत आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद देशमुख आणि परिषदेचे सरचिटणीस एड. जेनेकर, समन्वयक डॉ. श्रावण बाणासुरे , अरूण झगडकर  यांनी एकंदरीत संमेलनाच्या स्वरूपाबद्दल समाधान आणि आनंद व्यक्त करून गाव परिसरातील जनतेने या साहित्य संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केलेले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]