अवैध रेती तस्करीवर आढा घालण्यात यावा याकरिता चिमूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन


अवैध रेती तस्करीवर आढा घालण्यात यावा याकरिता चिमूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे 
उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.विजय गावंडे पाटील यांनी दिनांक.०९/११/२०२२ ला उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांना अवैध रेती तस्करीवर आळा घालण्यात यावा याकरिता निवेदन दिले. व चिमूर तालुक्यामध्ये  चिमूर, नेरी, मासळ, उसेगाव, मदनापूर, खडसंगी, मोटेगाव, भिसी परिसरात खुप मोठया प्रमाणात रेतीची तस्करी होत असून दैनंदिन कोट्यावधी रुपयांचा महसूल चोरी केल्या जात आहे.सदर तस्करी हि उपविभागीय अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे होत आहे. महसूल  विभागाचे कोतवाल, तलाठी, आर. आय. यांच्या उपस्थित सुध्दा रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. यावरुन असे लक्षात येते की, रेतीची तस्करी कोतवाल, तलाठी, आर.आय. यांच्या संगणमताने होत आहे. रेती तस्करी होवू नये म्हणून समिती गठीत करुन दैनंदिन होणारी रेती तस्करी थांबवायला पाहिजे असे न करता शासनाचा महसूल बुडविण्यास शासकीय कार्य प्रणाली चा गैर वापर करणे हा गुन्हा असून अशा दुर्लक्षित धोरणामुळे पत्रकारांवर रेती माफियांचा जीवघेणा हल्ला तसेच जीवे मारण्याची धमकी याबाबत दैनंदिन चिमूर पोलीस स्टेशन ला गुन्हे दाखल होत असतांना महसूल प्रशासन सुस्त अवस्थेत बसून असेल तर काय कायदा आणि कसली सुव्यवस्था म्हणावी ? याकडे जातीने लक्ष न दिल्यास समोर मोठी घटना होणे टाळता येत नाही.म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्ह्यातील महसूल विभाग यांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करावी जेणेकरून शासनाचा महसूल बुडणार नाही. अवैध रेती तस्करीवर आळा न बसल्यास चिमूर तालूका कांग्रेस पक्षातर्फे मोठे आंदोलन छेडण्यात  येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेवादल सहसचिव प्रा.राम राऊत सर,चिमूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ.विजयजी गावंडे पाटील , काँग्रेस कमिटी चिमूर चे ज्येष्ठ नेते धनराजजी मालके, चिमूर शहर काँग्रेस अध्यक्ष अविनाश अगडे,पर्यावरण काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रदिप तळवेकर, माजी नगसेवक विनोद ढाकुनकर, मुख्याध्यापक रामटेके सर, ओबीसी विभाग अध्यक्ष विलास डांगे, मिडिया प्रमुख पप्पू भाई शेख, गुरूदेव जुनघरे व आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]