माणुसकीची दोरी उपक्रमांतर्गत गरजूंना कपड्याचे वितरण


माणुसकीची दोरी उपक्रमांतर्गत गरजूंना कपड्याचे वितरण

मूल प्रतिनिधी 

मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित येथे सुपुष्पमंगल बहुउद्देशीय संस्था येरगाव यांचे वतीने माणुसकीची दोरी उपक्रमा अंतर्गत गरीब व गरजू लोकांना कपड्यांचे वाटप करण्यात आले.

सुपुष्पमंगल बहुउद्देशीय संस्था ही विविध सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवत असते. अत्यंत गरीब व गरजू लोकांना कपड्यांचे वितरण दरवर्षी संस्थेतर्फे केल्या जाते. याही वेळेस कपड्याचे वाटप करण्यात आले.

माणुसकीची दोरी या उपक्रमाचे जनक किरण नागापुरे यांच्या संकल्पनेतून गोरगरीब अत्यंत गरजू लोकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार कपड्यांची गरज भागविण्याकरीता हा उपक्रम तयार करण्यात आला. उपक्रमाचा नागरिक मोठ्या प्रमाणात उपयोग करीत आहेत. ज्यांच्याकडे वापरात असलेले कपडे असल्यास त्यांनी या संस्थेकडे आणून द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

माणुसकीची दोरी या उपक्रमा अंतर्गत कपड्याचे वितरण करताना संस्थेचे अध्यक्ष मंगलदास मशाखेत्री, माणुसकीची दोरी या उपक्रमाचे जनक किरण नागापुरे आदी सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]