12 एकर धानाच्या पुंजण्याला आग, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान, गडीसूर्ला येथील घटना
मूल  प्रतिनिधी

मूल तालुक्यातील गडीसूरला येथील गिरीश आगरकाटे यांच्या शेतात ठेवलेल्या धानाच्या पुंजण्याला काल रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आग लावली. यामध्ये धानाचे पुंजने पूर्णपणे जळून खाक झाले. यात 12 एकरात धान असलेल्या लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ही घटना माहीती होताच मूल पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीशसिंह राजपूत यांनी घटनास्थळी भेट दिली. नगरपरिषद मूल येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. पुढील तपास ठाणेदार राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली मूल पोलीस करीत आहे.


विशेष म्हणजे काल मूल तालुक्यातील सात ग्रामपंचायतचा निवडणूक निकाल जाहीर झाला. या सात ग्रामपंचायतीत गडीसुरला ग्रामपंचायत सुद्धा निकाल जाहीर झाला. गडीसूरला येथे भाजपाचा विजय झाला. कालच्या रात्रीच भाजपाचे पदाधिकारी असलेल्या वंदनाताई आगरकाटे यांच्या धानाच्या पूजन्याला आग लागल्याने संशय व्यक्त केल्या जात आहे. आग लागली की लावण्यात आली हे तपासांअंती कळणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]