रनिंग स्पर्धेत जयश्री लोणबले तालुक्यात प्रथममुल येथील नामांकित नवभारत कन्या विद्यालयची विद्यार्थिनी जयश्री  मोरेश्वर लोनबले ही तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत २०० मीटर व ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळाल्याने सर्वत्र तिचे कौतुक केले जात आहे.
मुल येथील तालुका क्रीडा संकुलात नुकतेच तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आले. या स्पर्धेत तालुक्यातील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेतील 200 मीटर व 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत, जयश्री लोणबले हिने पहिला क्रमांक मिळवून, जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र झाली. जयश्रीच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात असून संस्थेचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब वासाडे संस्थेचे सचिव अॅड. अनिल वैरागडे मुख्याध्यापिका मंगला सुंकरवार पर्यवेक्षक सुधाकर पुराम, शारीरिक शिक्षक दिनेश जिड्डीवार यांचे सह अनेक शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]