संतोष थिपे सुवर्णपदक चे मानकरीबल्लारपूर :-(धनंजय पांढरे)

वनसंपत्तीचे संरक्षण आणि संवर्धनाचे काम प्रभावीपणे करणाऱ्या वन अधिकाऱ्यांना राज्य शासनातर्फे दरवर्षी सन्मानित केले जाते. सन २०१९-२० यावर्षीच्या सुवर्णपदकाचे मानकरी मोहर्ली बफर क्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी संतोष थिपे राज्य शासनाच्यावतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. वनविभागात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोधर्य वाढविण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी मुख्य वनसंरक्षक शिफारस करतात. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे चारित्र्य,
तांत्रिक कार्यक्षमता, गुणवत्ता आदी बघितली जाते. थिपे यांनी यापूर्वी चंद्रपूर आणि बल्लारपूर वनपरिक्षेत्रात काम केले आहे. कर्तव्यावर असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. तो त्यांनी धाडसाने परतवून लावला. तेव्हा तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पत्र पाठवून कौतुक केले होते. याशिवाय वाघाच्या हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न नेहमीच चर्चेत राहिले आहे. जनवन विकास योजनेतंर्गत पन्नास युवकांना त्यांनी सैन्य भरतीचे प्रशिक्षण दिले. सोबतच ताडोबा मोहुर्ली वनपरिक्षेत्रातील ४० गाईडला त्यांनी इंग्रजीचे प्रशिक्षण दिले. याशिवाय अनेक सामाजिक उपक्रमात ते नेहमी अग्रेसर असतात. याच त्यांच्या कार्याची दखल वनखात्याने घेतली आणि त्यांना सुवर्णपदकाचे मानकरी ठरविले. यावर्षी चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील सहायक वनसंरक्षक बापू येळे हे रजतपदकाचे मानकरी ठरले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]