अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू.(तळोधी बा.):
तळोधी बाळापुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावरगाव येथे काल सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान तळोधी येथून कामावरून  सायकलने परत येवून घराकडे परत जात असताना.  सावरगाव येथील आदिवासी सहकारी सोसायटी समोर 7:35 वाजता सावरगाव कडुन तळोधी कडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे सेवकराम सावरकर व 62 वर्ष हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच  त्यांना तात्काळ नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र  येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
     या घटनेची माहिती मिळतात अज्ञात वाहनाचा शोध घेणे सुरू आहे. पुढिल तपास तळोदी बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार बी. आर. शेंडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार संजय मांढरे व मनीष गेडाम हे करीत आहेत.
     विशेष म्हणजे शिंदेवाही नागपूर या मार्गाने रेती व गिट्ठीने भरलेले टिप्पर हे मोठ्या प्रमाणात व वेगाने यांची रहदारी सुरू असते. त्यामुळे व रात्रभर रेती सप्लायचा काम या परिसरातून नागपूरला केला जातो त्यामुळे या टिप्पर च्या वाहतुकीने या परिसरात अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]