नागभिड, तालुक्यात अवैध खनिज वाहतूक जोमात, शासनाच्या करोडो च्या महसूल ला चुना. (रस्त्याच्या कामांमध्ये अवैध मुरूम व रेतीचा वापर )



 यश कायरकर,तळोधी बा: 
    नागभिड तालुक्यात अवैध उत्खनन व खनिज तस्करी वाहतुकीने कहर केला असून महसूल विभाग प्रशासनाकडून सोयीस्कर पणे दुर्लक्ष केले जात असल्याने शासनाला करोडो रूपयांचा चुना लागला जात आहे. 
    तळोधी अप्पर तालुक्यातील  वाढोणा - सावरगाव - कन्हाळगाव ब्राम्हणी या रस्त्याच्या बाजूला भरन्या करीता, व गोसेखुर्द कालव्याच्या कामांकरिता दिवसाढवळ्या व रात्रीच्या वेळेस याच परिसरातील १० ते २० हायला ट्रक ने राजरोसपणे मुरुम वाहतूक होत आहे.  तसेच  वनविभागाची कुठलीही परवानगी न घेता जंगल परिसरातून रस्ते बनवून झाडं तुडवत राजरोसपणे अरेरावी ने अवैध मुरूम वाहतूक केली जात आहे.
      या परिसरात गोसीखुर्द खुर्द कालव्याचे व सिमेंट क्रांक्रिट रोडचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नदी पात्रातून मध्यभागी रेतीचे उत्खनन करून  या परिसरात सुरू असलेल्या प्लंन्टवर अवैध मार्गाने टाकल्या जातात.  मार्गाने अप्पर तालुक्यातील गावागावात सुरू असलेल्या सिमेंट क्रांक्रिट रोडचे बांधकाम साठी रेती ची तस्करी केली जात असताना कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. तसेच मुख्य मार्गालगत अवैध रेती चे मोठे मोठे ठिगारे असताना प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने  शासनाला करोडो रूपयांचा चुना लागला जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या महसूल मंत्री साहेबांनी नागभीड तालुक्यात होत असलेल्या अवैध मुरूम- रेती वापरनार्या कंत्राटदार, कंपनी वर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 
*या कंत्राटदारांवर नेमके अभय कुणाचे?*
अवैध उत्खनन व वाहतूक, तस्करी करणाऱ्या वर कारवाई थंड बस्तयात आहे. प्रशासनाचा करोडो रूपयांचा महसूल बुडविला जात आहे. खनिज माफियाना कारवाई ची भिती नाही. कुठल्याही महसूल अधिकारी वर्ग व पोलीस अधिकारी वर्गाचा, व वन अधिकारी यांचा वचक नसल्यामुळे दिवस  रात्री मुरुम - रेती वाहतूक होत आहे. तसेच तस्करी करणाऱ्या खनिज तस्कराकडून विना नंबर प्लेट चे हायवा ट्रक ने वाहतूक होत असताना पोलीस विभाग गप्प बसला आहे. मुख्य  मार्गावर वरून खनिज वाहतूक होत असताना गस्त धारी पोलीस वर्ग, तलाठी, तहसीलदार, वन विभागाचे कर्मचारी, चौकशी व कारवाई का करित नाही ? व शेतकरी, ग्रामीण लोक घरगुती कामे करन्या करीता थोड्या प्रमाणात मुरुम रेती आणतात कार्यवाही केली जाते. हे दुर्दैवी आहे.  असे सामान्य नागरिकांच्या कडून खेद व्यक्त केली जाते आहे.
"आम्हाला अशा अवैध उत्खन बद्दल माहिती मिळाली तर आम्ही नक्कीच कारवाई करू" - तहसीलदार नागभीड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]