जि. प. शाळा पारडी (ठ.) येथील विज्ञान भवनाचे लोकार्पणतळोधी बा (यश कायरकर)
माजी जि.प. सदस्य संजय गजपुरे यांच्या पाठपुराव्याचे फलित पंचायत समिती नागभीड अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पारडी (ठ.) येथे चालू शैक्षणिक सत्रात जिल्हा निधी अंतर्गत बांधण्यात आलेल्या विज्ञान भवनाचा लोकार्पण सोहळा माजी जि.प. सदस्य व भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजयभाऊ गजपूरे यांच्या हस्ते अतिशय थाटामाटात पार पडला.        
              पारडी (ठवरे) येथे विज्ञान भवनासाठी संजय गजपुरे यांनी जिल्हापरिषदेकडे सातत्याने पाठपुरावा करुन मंजुरी मिळवली होती. या शाळेला प्रशस्त परीसर असुन येथे सायन्स पार्क साठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले . 
             विज्ञान भवन लोकार्पण सोहळयाच्या कार्यक्रमाला उदघाटक संजयभाऊ गजपूरे, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा स्थायी समिती सदस्य, जिल्हा परिषद चंद्रपूर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  ग्रामपंचायत पारडी (ठ) चे सरपंच दिलिपजी दोनोडे, व उपाध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराजजी ठवरे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच नंदुजी खोब्रागडे व मुख्याध्यापक अशोकजी शेंडे होते.
           कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक शेंडे सर यांनी केले. संचलन सुनील हटवार सर तर आभार प्रदर्शन गौतम राऊत सर यांनी केले.
       कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक रतिरामजी ठवरे, शक्ती केंद्र प्रमुख गुरुदेव नागापुरे ,  ग्रा.पं.सदस्य नितेश शेंडे, अनिताताई ठवरे, सुनिताताई ठवरे, गिताताई रडके, सुरेखाताई गजभे, शारदाताई मेश्राम, प्रकाश बन्सोड, दिलीप मेश्राम, तुळशिदास गजभे, वर्षाताई बागडे, उर्मिलाताई मेश्राम, जिजाताई मेश्राम, स्मिताताई ठवरे, अरुण रंधये, गुरूदेव सारये , धनराज मेश्राम, बाजीराव भोयर, अंबादास आलबनकर इत्यादी शाळा व्यवस्थापन सदस्य व गावकरी मंडळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]