विद्यार्थी आणि शिस्त यांचा जवळचा संबंध- न्यायाधीश पंकज अहीरविद्यार्थी आणि शिस्त यांचा जवळचा संबंध आहे. जीवनात शिस्त अतिशय आवश्यक आहे. आणि आपल्याला शिस्त संविधानातून शिकायला मिळते. असे प्रतिपादन मूलचे दिवाणी व फौजदारी कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश पंकज अहिर यांनी व्यक्त केली. मूल येथील नवभारत कन्या विद्यालयात आयोजित संविधान सप्ताह कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून तेे बोलत होते.
मूल तालुका विधी सेवा समिती व तालुका अधिवक्ता संघ यांच्या वतीने नवभारत कन्या विद्यालय मुल येथे आज संविधान सप्ताह दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मूलचे दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश पंकज अहिर होते. यावेळी मुख्याध्यापिका सौ मंगला सुंकरवार अॅड. प्रणव वैरागडे, अॅड. स्नेहल भडके, अॅड. अनंत बल्लेवार, केंद्रप्रमुख प्रमोद कोरडे, विस्तार अधिकारी जयश्री गुज्जनवार, मुख्याध्यापक अशोक झाडे, पर्यवेक्षक सुधाकर पुराम, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी एडवोकेट अनंत बल्लेवार, एडवोकेट स्नेहल भडके एडवोकेट प्रणव वैरागडे, विद्यालयाची विद्यार्थिनी सलोनी गुलबमवार यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे संचालन अर्चना बेलसरे यांनी तर आभार प्रदर्शन दिनेश जिड्डीवार यांनी केले.
कार्यक्रमात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सकिना शेख या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास नवभारत कन्या विद्यालयातील विद्यार्थीनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]