रोजगार हमी योजनेत मजुरांना लावावी लागेल ऑनलाईन हजेरीपारदर्शकतेच्या दृष्टीने बदल मात्र ही सिस्टीम ठरेल मजुरांना मारक
सावली (प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील अकुशल मजुरांच्या हाताला काम मिळावे, त्यांना आपल्या गावातच रोजगार उपलब्ध करून द्यावा, या उद्देशाने सुरू झालेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही मजुरांना तारक ठरलेली होती मात्र पारदर्शकता यावी याकरीता ऑनलाईन हजेरी लावावी लागत असल्याने नेटवर्क अभावी दिवसातून दोनदा हजेरी लावावी लागत असल्याने ही योजना मजुरांसाठी तारक ठरण्याऐवजी मारक ठरेल ही भीती आहे.
        रोजगार हमी योजनेमध्ये पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न शासनाकडून नेहमी केल्या जातो व तेही आवश्यक आहे परंतु या योजनेत इतकी पारदर्शकता निर्माण केल्या जात आहे की कोणत्या अधिकारीला या कामात आवड राहीलेली नाही.   त्यातच नवीन नॅशनल मॉनिटरिंग सिस्टीम मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर हजेरी लावण्याकरिता करण्याची सिस्टीम तयार केली आहे.
नॅशनल मॉनिटरिंग सिस्टीम मोबाईल ॲप्लिकेशद्वारे हजेरीमध्ये हजेरी लावल्यास बोगस मजूर दाखवता येणार नसल्याने आर्थिक पारदर्शकता येईल हा उद्देश आहे.  नॅशनल मॉनिटरिंग सिस्टीम मोबाईल ॲप्लिकेशनचा उपयोग करून आता रोजगार हमी योजनेवर काम करत असलेल्या मजुरांची दिवसातून दोन वेळा हजेरी घेतली जाते. ज्या ठिकाणी २० किंवा त्यापेक्षा जास्त मजूर काम करतात त्या मंजुरांची उपस्थिती या ॲप्लिकेशनमध्ये दर्शवली जाते. केवळ ऑनलाईन हजेरीच नव्हे तर त्यासोबत दिवसातून दोन वेळा नोंदणीसह फोटो देखील अपलोड करावे लागणार आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर प्रत्यक्ष किती मजूर हजर आहेत हे या नॅशनल मॉनिटरिंग सिस्टीम मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे समजण्यास सोपे होणार आहे. त्यामुळे यापुढे रोजगार हमी योजनेमध्ये नक्कीच पारदर्शकता येवू शकते. परंतु ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची अडचण, हजेरी लावताना काही चूक झाली तर दुरुस्ती करता येणार नाही व परिणामी मजूर काम करूनही हजेरी अभावी मजुरीपासून वंचित राहणार. कामानुसार दाम असल्याने मजुरी फक सकाळी एक वेळेस काम पूर्ण करतात पण या सिस्टीममध्ये दोन वेळेस हजेरी लावायची असल्याने मजुरीवर परिणाम पडणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]