शेतात काम करीत असलेल्या महिलेवर पट्टेदार वाघाने घेतली ऊडी


महिला गंभीर जखमी

प्राथमिक आरोग्य केंद नेरी येथे उपचारासाठी दाखल

तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी) 

चिमूर : - नेरी जांभुळघाट रोडवरील रामपुर या गावाच्या शेतशीवारात शोभा धारने यांच्या शेतात काम करत असतांना तीन वाजताच्या दरम्यान रीना हरीदास जा॓भुळे नेरी वय 35 वर्ष या महीलेवर पट्टेदार वाघाने अचानक हल्ला केला तेव्हा वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी तिने आरडाओरडा केला आणि बाजूच्या शेतातील महिलांनी एकच बोंब ठोकली त्यामुळे रीना ला वाघाने सोडले आणि जंगलाच्या दिशेने धूम ठोकली 

सदर हल्ल्यात वाघाने तिला जखमी केले अचानक झालेल्या हल्याने महिला घाबरून गेली त्यामुळे बाजूच्या महिलांनी हल्ल्याची माहिती देताच नागरिक जमा झाले तात्काळ सदर जखमी महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे ऊपचारासाठी दाखल करण्यात आले सदर घटनेची माहिती मिळताच नेरी वन क्षेत्राचे क्षेत्रासाह्ययक अधिकारी रासेकर रुग्णालयात दाखल होत महिलां प्रकृती ची विचारपूस करित प्राथमिक आरोग्य केंद नेरी येथे उपचारासाठी दाखलपुढील तपास करीत आहेत या घटनेमुळे शेतकरी शेतमजुर भयभीत झाले असुन नेरी रामपुर आजुबाजुच्या परीसरातील भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]