पाच ग्रामपंचायत च्या महिलाराज सरपंच पैकी ४ कांग्रेस च्या तर १ भाजपची सरपंच.पाच ग्रामपंचायत च्या महिलाराज सरपंच पैकी ४ कांग्रेस च्या तर १ भाजपची सरपंच.
तळोधी बा.: (यश कायरकर)
    नागभिड तालुक्यातील पाच ग्रामपंचायत च्या महिलाराज सरपंच कोण होणार या कडे जनतेचे लक्ष वेधून होते मात्र आज  झालेल्या मतमोजणी मध्ये ही प्रतीक्षा संपली आहे.
     नागभीड तालुक्यातील गिरगाव, गोंविदपूर, चिखलगाव, मिंथुर, व मांगली अरब याठिकाणी सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक साठी १८ नोव्हेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले होते. मात्र या पाच ग्रामपंचायत मधून लोकनियुक्त महिला सरपंच कोण होणार याकडे नागभीड तालुक्यातील व निवडणूक झालेल्या गावातील नागरिकांचे लक्ष लागले होते. 
         या पाच ही ग्रामपंचायत निवडणूक साठी महिला व पुरुष मतदार यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करून मतदानाची टक्के वारी वाढल्याने कांग्रेस, भाजप, वंचित, व शिवसेना समर्थक ग्राम विकास आघाडी व परिवर्तन आघाडी असलेल्या उमेदवार आपले विजयाचे तर्क, वितर्क गणित मांडून बसले होते. मात्र  आज २० तारखेला मतमोजणी झाल्यानंतर प्रत्यक्ष महिला  सरपंच  पैकी नागभीड तालुका ग्रा. पं. सरपंच निकाल हा   1) गिरगाव: येथे गिताबाई बोरकर (भाजपा ),  2) चिखलगाव : येथे    सिंधुताई उईकें (काँग्रेस), 3) गोविंदपुर: येथे शालू हांडेकर (काँग्रेस ) 4)मिंथुर:  येथे      विशाखा डोंगरे (काँग्रेस) 5)मांगली:  येथे सरिता मेश्राम.(काँग्रेस)  ह्या विजयी झाल्यात.
        पाच ५ पैकी चार ४ ग्रामपंचायत ला कांग्रेस चे महीला सरपंच तर एक ग्रामपंचायत ला भाजपचे सरपंच निवडून आले आहेत. यापैकी गोविंदपुर येथे संपुर्ण ११ सदस्य हे कांग्रेस चे निवडून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]