चिमुर तालूक्यात वनविभागाच्या आर्शिवादाने अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चिमूर तालूक्यात चिमुर व तळोधी रेंज च्या वनविभाग क्षेत्रामध्ये अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू असुन याबाबत प्रादेशिक वनपरिक्षेत्र चिमूर यांना माहिती असून सुध्दा हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. (नेरी, शंकरपुर, भिसी , बोडधा, हेटी, कोटगाव, पिंपळगाव, मेटेपार, मांगलगाव, शिवरा, शिरसपूर, डोमा) या परीसरात बाभूळ तसेच सागवान व आळजात अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे.काही ठेकेदार मागील दोन,तीन वर्षा पासुन वनविभागाची पर्वांगी न घेता विविध जातीचे वृक्षतोड करीत आहे.शेत शिवार व नदी पात्रालगतचे हजारों च्या संख्येमध्ये वृक्षतोड ठेकेदारानी केली आहे. दिवसा व रात्रोला क्रेन द्वारे लाकूड ट्रक मध्ये भरून नागपुर कडे नेण्यात येत आहे. अश्या प्रकारे अवैध वृक्षतोड दैनंदिन सुरु असून याकडे वनविभागा ने लक्ष दिले नाही तर काही दिवसात नदी पात्र व शेतशिवारात वृक्ष दिसणार नाही. ठेकेदार इतकी हिम्मत कुणामुळे करीत आहे याची चौकसी वनमंत्री यांचे कडून होण्याची गरज आहे.ठेकेदार व वनविभाग यामध्ये संबंध तर नाही ना? अशीही चर्चा जनतेमध्ये रंगली आहे.ही संपुर्ण चौकसी होणे गरजे चे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]