चिमूर तालुक्यातील मृतक, नरकवासी वन व महसूल विभागाच्या तेरवीचा कार्यक्रम १३ डिसेंबरला - सारंग दाभेकर माजी शिवसेना तालुका प्रमुख चिमूर

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - ०३/१२/२०२२ गाव निस्तार हक्कातील व वन विभागाची गौण खनिज रेती, मुरमाची चिमूर येथे मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. सिमेंट गट्टू उद्योग तसेच सिमेंट काँक्रीट मिक्सर उद्योग हे तालुक्यात अवैधरित्या सुरू असून या उद्योगाला लागणारा कच्चा माल रेती हि सुद्धा चोरीची असल्याची शंका आहे. तसेच निवासी व वाणिज्यकरीता लागणारी जमीण अवैध व नियमबाह्यरित्या अकृषक करण्याचा गोरख धंदा सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. व सामान्य लोकांना वन व महसूल विभागातील लहान लहान कामासाठी पाच-सहा महिने तर कुणाला वर्षभर कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. चिमूर तालुक्यात तलाठी साझा,  तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, व वनविभागा चे कार्यालय असून सुद्धा गौण खनिजांची चोरी, अवैध व्यवसाय व कार्यालयातील इतर भ्रष्टाचार यावर कोणतेही नियंत्रण नाही. परिणामी जनतेला नाहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यात वन व महसूल कार्यालय असूनही नसल्यासारखे मृतावस्थेत, नरकवासी झाले आहे. याचा निषेध म्हणून शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख सारंग दाभेकर यांच्या नेतृत्वात वन व महसूल विभागाची प्रतिकात्मक तेरवी करण्याचा कार्यक्रम दिनांक.१३/१२/२०२२ रोज मंगळवाराला दुपारी १३:०० वाजता प्रशासकीय भवन चिमूर समोर १३ लोकांना खीर खाऊ घालून करण्याचे ठरविले आहे. उपरोक्त तेरवी कार्यक्रमाला सारंग दाभेकर यांनी उपविभागीय अधिकारी महसूल कार्यालय चिमूर यांच्याकडे रितसर लिखित अर्ज करून परवानगी मागितली आहे. त्याच प्रमाणे पोलीस निरिक्षकांना सुद्धा या वेगळ्या अशा आंदोलनाची माहिती दिलेली आहे. प्रतिकात्मक तेरवी कार्यक्रमावर आयोजक ठाम असून जर वन महसूल विभागा कडून १३ तारखेपर्यंत गौण खनिजाच्या चोऱ्या व अवैध धंद्यावर कारवाया केल्या व चोरांवर आणि अवैद्य व्यावसायिकांवर दंडात्मक कार्यवाही केली तर सदर तेरवी आंदोलन मागे घेण्यात येईल असे ही सारंग दाभेकर यांनी माननीय उपविभागीय अधिकारी चिमूर यांना पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे दाभेकरांच्या या अनोख्या आंदोलनाचा वन व महसूल विभागावर कितपत परिणाम होणार ? सदर विभागाचे अधिकारी १३ डिसेंबर पर्यंत खरोखरच रेती, मुरूम चोरांवर कार्यवाही करणार काय ? की बहुतेक गौण खनिजाचे चोर, अवैध व्यावसायिक हे आमदार, खासदार व मंत्री यांचे व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याने अधिकाऱ्यांना नेत्यांचा फोन आल्यानंतर नेहमी प्रमाने कार्यवाहिविना सोडून देतील ? याकडे जनतेचे लक्ष लागले आहेत. मात्र सारंग दाभेकरांच्या  या अनोख्या आंदोलनाने वन व महसूल विभागच्या अधिकाऱ्यांना नरकातून जिवंत होऊन यावेच लागेल, मृतावस्थेतून बाहेर पडावेच लागेल व कोणत्याही नेत्यांच्या राजकीय दबावाला बळी न पडता कर्तव्यदक्ष राहून रेती, मुरूम, दगड तस्करांवर आणि अवैध धंद्यांवर दंडात्मक कार्यवाही करावीच लागेल. अशी परिसरात चर्चा रंगली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]