घोडाझरी नवरगाव शाखेतील मजुरांचे मजुरी त्वरित द्या.- दादाजी सहारे
तळोधी बा.
         चंद्रपूर पाटबंधारे विभागा अंतर्गत येत असलेल्या घोडाझरी तलावाचे पाणी वाटत करणाऱ्या नवरगाव शाखेतील मजुरांचे पैसे त्वरीत देण्याची मागणी कामगार प्रतिनिधी दादाजी सहारे यांनी केली आहे.
             घोडाझरी तलावाचे दोन विभाग असून तळोधी व नवरगाव या दोन विभागा अंतर्गत पाणी वाटप कामगार काम करतात गेल्या चार महिन्यांनाचे पैसे संबंधित कंत्राटदाराने अजूनपर्यंत नवरगाव शाखेतील कामगारांचे पैसे न दिल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. संबंधीत ठेकेदाराने तळोधी शाखेच्या कामगारांचे पैसे नुकतेच दिले मात्र नवरगाव शाखेचे पैसे अजूनपर्यंत दिले नाही.पंधरा दिवसात पैसे दिले जातील असे संबंधित ठेकेदाराने सांगितले होते,मात्र पंधरा दिवसांचा काळ लोटूनही अजून पैसे दिले नाही. मजुरी न मिळाल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तळोधी शाखेतील कामगारांना वेगळा न्याय व नवरगाव शाखेतील कामगारांना वेगळा न्याय का?असा सवाल कामगारांनी केला आहे. जर आठ दिवसात पैसे मिळाले नाही तर सर्व कामगार घोडाझरी कार्यालया समोर उपोषणाला बसणार असल्याचे सहारे यांनी सांगितले. तरी लवकरात लवकर सर्व कामगारांना चे पैसे देण्यात यावे अशी मागणी कामगार प्रतिनिधी दादाजी सहारे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]