ग्रामीण भागातील विद्यार्थी- विद्यार्थिनी, पालक व शिक्षकांनी दिले आगार प्रमुखांना निवेदन.

ग्रामीण भागातील विद्यार्थी- विद्यार्थिनी, पालक व शिक्षकांनी दिले आगार प्रमुखांना  निवेदन.

 तळोधी(बा)
   ग्रामीण भागातून शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी तळोधी(बा) येथे येतात; परंतु सकाळी शाळेत येताना व सुट्टी झाल्यानंतर घरी
परत जाण्यासाठी त्यांना बसेस वेळेवर उपलब्ध राहत नाही. त्यामुळे शाळेत जायला कधी  दुपार अन् शाळेतून घरी यायला अंधार पडतो. दररोज शाळेची सुटी झाल्यावर बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींना बसस्थानकावरील असुविधेअभावी बसस्थानकाशेजारी ताटकळत उभे राहावे लागते.मुलींच्या सुरक्षेला यामुळे धोका निर्माण झालेला आहे.त्यामुळे, विद्यार्थिनीसाठी वेळेवर व अतिरिक्त बस सोडावी तसेच बसेस बस स्थानकावर थांबवावी, अशी मागणी विद्यार्थी- विद्यार्थिनींनी विद्यालयाच्या वतीने पत्राद्वारे ब्रम्हपुरी आगार व्यवस्थापकांकडे केली आहे.
   शासनाने मानव मिशनअंतर्गत एसटी बसेस सुरू केल्या. त्यामुळे,तळोधी(बा) लगत असलेल्या ओवाळा, पळसगाव (खुर्द),सावंगी(बडगे), जनकापूर, चिंधीचक,बाळापूर, देवपायली,बाळापूर,बोंड ,चारगाव(चक), कोजबी,सोनापूर येथील विद्यार्थीनी लोकविद्यालय तळोधी(बा) व इतर विद्यालय-महाविद्यालय व कॉन्व्हेंटमध्ये शिक्षणासाठी येतात मात्र,विद्यार्थ्यासाठी सुरू केलेल्या मानव विकास मिशनच्या एसटी बसेस अनेकदा शाळेच्या सुट्टीनंतर वेळेवर येत नाही.शिवाय मानव विकास बसेस वेळेवर येत नसल्याने अनेकदा जलद बसेसला हात दाखवूनही एसटी बसेस थांबत नाही त्यामुळे विद्यार्थी- विद्यार्थीनीना शाळेतुन घरी जायला बराच उशीर होतो. परिसरातील बरीच गावे जंगलालगत असल्याने,वाघाच्या दहशतीमुळे लवकर घरी जाण्यासाठी जलद बसेस व इतर बसेसमध्ये बसवुन वेळेवर पोहण्याकरीता व इतर समस्येसाठी विद्यालयाच्या वतीने पत्राद्वारे विनंती करण्यात आली.
   यावेळी लोकविद्यालय तळोधी(बा) येथील शिक्षक , विद्यार्थी- विद्यार्थीनी व पालक उपस्थित होते.


Box 

"डिव्हायडरमुळे बसेस बस स्टॅन्डवर लावणे अडचणीचे ठरत आहे.बांधकाम विभागाणे डिव्हायडर दुरुस्त केल्यास बसेस लावता येईल तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींना लवकर घरी जाता यावे यासाठी जलद बसेस थांबविण्यासाठी आगार प्रमुख ब्रम्हपुरी यांना विनंती करण्यात आलेली आहे. "- *वाहतूक नियंत्रक तळोधी(बा)* 


"ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना लवकर घरी जाता यावे यासाठी जलद बसेस थांबविण्याचे सूचना वाहतूक नियंत्रकांना देण्यात आलेले आहे. तसेच तळोधी(बा) येथील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस निरीक्षक तळोधी(बा) यांना पत्राद्वारे विनंती करण्यात आलेली आहे."
- *आगार व्यवस्थापक*,
ब्रम्हपूरी आगार ब्रम्हपूरी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]