बेंबाळ ग्रामपंचायतीवर परिवर्तन पॅनलचा झेंडा

बेंबाळ ग्रामपंचायतीवर परिवर्तन पॅनलचा झेंडा

सरपंचासह सात सदस्य मोठ्या मताधिक्याने विजयी


बे़ंबाळ:- नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मुल तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी बेंबाळ ग्रामपंचायतीवर जिल्ह्यातील लोकांचे लक्ष लागलेले होते. या निवडणुकीत भाजपा समर्थित विकासपुरुष ग्राम विकास आघाडी तर काँग्रेस व बौद्ध समाज समर्थित परिवर्तन पॅनल यामध्ये जोरदार टक्कर झाली. यामध्ये परिवर्तन पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार चांगदेव काशिनाथ केमेकार यांना १२७९ मते मिळवले तर विकास पुरुष ग्रामविकास आघाडीचे मुन्ना कोटगले यांना १००२ मते मिळाली. सरपंच पदासाठी तब्बल २७७ मतांची आघाडी परिवर्तन पॅनलला मिळाली. परिवर्तन पॅनलचे एकूण ७ सदस्य निवडून आले त्यामध्ये  प्रभाग १ मधून आशाताई शेंडे प्रभाग २ मधून अरुणा गेडाम,कविता किशोर नंदिग्रामवार, प्रभाग ३ मधून विनोद हरिदास वाढई, तर प्रभाग ४ मधून तीनही उमेदवार  मोठ्या मताधिकाने विजयी झाले.यामध्ये आशा उमाकांत मडावी, किशोर गणपत पगडपल्लीवार, देवाजी ध्यानबोईवार हे उमेदवार निवडून आले. तर विकास पुरुष ग्रामविकास आघाडीचे प्रभाग क्रमांक १ मधून चंद्रकांत गोहणे,प्रतिमा भडके, प्रभाग क्रमांक ३ मधुन शिला कंकलवार निवडून आले.तर प्रभाग २ मधुन जनकल्याण आघाडीचे राकेश दहीकर निवडून आले. परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचे श्रेय दीपक वाढई, प्रशांत उराडे, पवन नीलमवार, किशोर नंदिग्रामवार, उमाकांत मडावी, लवसन वाढई दिवाकर कडस्कर, दीपक कोटगले, मदन उराडे, माणिक भडके, काशिनाथ भडके, मधुकरजी उराडे तसेच परिवर्तन पॅनलचे संपूर्ण सक्रिय कार्यकर्ते व सदस्य तसेच गावकऱ्यांना जाते.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]