श्रद्धेय बाबा आमटे जयंती निमित्त वरोऱ्यात हृदयरोग व सर्व रोग निदान तसेच उपचार शिबिर २६ तारखेला

स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे आयोजन

वरोरा व भद्रावती तालुका मिळून सदर शिबिर हे चौथे आरोग्य शिबिर

आजतागायत जवळपास ५ हजार नागरिकांनी घेतला लाभ तर पुढील उपचाराकरिता ४०० रुग्णांची सावंगी मेघे येथील रुग्णालयात रवानगी

ट्रस्ट तर्फे इतरही उपक्रम सातत्यपूर्ण सुरूच

तालुका - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )

वरोरा : - श्रद्धेय बाबा आमटे जयंती निमित्त दिनांक 26 डिसेंबर रोजी 'आरोग्य संकल्प अभियान' अंतर्गत वरोरा येथील साई मंगल कार्यालयात भव्य हृदयरोग व सर्व रोग निदान व उपचार  शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
       श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चारिटेबल ट्रस्ट चंद्रपूर, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने साई मंगल कार्यालयात सर्व रोग निदान व उपचार शिबिर संपन्न होणार असून या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या हस्ते होणार आहेत. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वरराव टेमुर्डे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक आचार्य ना.गो.थुटे, लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील सर, महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू , आनंदवन येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पोळ, मनसेचे नेते रमेश राजुरकर, माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली व भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष करण संजय देवतळे उपस्थित राहणार आहेत.
       या शिबिरात तपासणी केलेल्या रुग्णांची आवश्यकता असल्यास शस्त्रक्रिया करण्यासाठी सावंगी मेघे येथील रुग्णालयात अगदी स्वस्त दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तसेच शिबिरात रोग निदान झालेल्या रुग्णांना सुद्धा स्वर्गीय श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर द्वारा संपूर्ण मदत केल्या जाणार आहे. शिबिराचा प्रारंभ सकाळी ९ वाजता होणार असून जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रवींद्र शिंदे, दत्ता बोरेकर, हेमराज कुरेकर, विठ्ठल टाले ,सचिन चुटे व महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाने केले आहे.
           वरोरा व भद्रावती तालुका मिळून सदर शिबिर हे चौथे आरोग्य शिबिर आहे. या पूर्वीच्या शिबिरामध्ये जवळपास ५ हजार नागरिकांनी लाभ घेतला तर पुढील उपचाराकरिता ४०० रुग्णांची ट्रस्ट तर्फे सावंगी मेघे येथील रुग्णालयात रवानगी करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]