जीव मुठीत धरून शेतीची कामे सुरू वाघाच्या भीतीने मजुरही सापडेना शेतकरी अडचणीतसावली (प्रतिनिधी) 
तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात आठवड्याभरात तीन मनुष्यहानीच्या घटना घडल्यामुळे व अजूनही वाघांचा वावर असल्याने मजूर जिवाच्या भीतीपोटी येण्यास तयार नाही तर शेतकरी स्वतःच्या शेतातील कामे भीतीच्या वातावरणात करीत आहेत.
सावली तालुक्यात रानटी डुक्कर, वाघ जंगलाच्या बाहेर येत गावशिवार, शेतशिवारात मनुष्यावर हल्ले करीत असल्याने फारच दहशत पसरली आहे. निलसनी पेठगाव येथील कैलास गेडेकर, रुद्रापूर येथील बाबुराव कांबळी, खेडी येथिल स्वरूपा येलेंट्टीवार यांचा शेतीत असताना वाघाच्या हल्ल्यात नाहक बळी गेला. त्यांनतर वनविभागाला जाग आली व जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. परन्तु दोन आठवडे उलटूनही वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले नाही.
शेतात भीतीपोटी जाणे बंद असल्याने खरीप पीक न घेता जमीन पडीक ठेवावी लागत आहे, रानडुक्कर पीक उध्वस्त करीत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. शेतात कापूस, तूर , धान ही पिके पडून आहेत.  शेतकरी भीतीच्या वातावरणात कसेतरी आपली कामे करून घेत आहे तर मजूर येण्यास तयार नाही. शेतकरी डपले, पिपे वाजवून फटाके फोडून कामे करीत आहेत. महिला पुरुषाचा सहारा असल्याशिवाय शेताकडे जात नाही. यामुळे शेतीची कामे कशी करायची हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. वनविभागाने प्रत्येक गावातील 20 मदतनीस कार्यकत्यांची वाघाच्या घडामोडीवर व शेतकऱ्यांना मदत होईल यासाठी नेमणूक करणार असल्याचे आश्वासन दिले मात्र अंमलबजावणी होताना दिसत नाही. या परिस्थितीत शेतकरी वनविभागाविरुद्ध रोष व्यक्त करीत आहेत. पुन्हा एकादी घटना घडल्यास लोकांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]