शास.औ. प्र. संस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

शास.औ. प्र. संस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 गडचिरोली (प्रतिनिधी)- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके होते तर प्रमुख अतिथी म्हणून सर्च  संस्थेचे श्री. पाटील, श्री. इसासरे, गटनिदेशक केशव डाबरे, आनंद मधुपवार,  बंडोपंत बोढेकर, नितीन श्रीगीरीवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती. संस्थेत सर्च संस्थेचे तारूण्यभान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सूत्रसंचालन गटनिदेशक भास्कर मेश्राम यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]